Breaking
ब्रेकिंग

पोलीस कॉन्स्टेबल वाय. के. सुंबे यांची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक!

0 1 2 4 6 3

पोलीस कॉन्स्टेबल वाय. के. सुंबे यांची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक!

 

महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्समध्ये तीन स्पर्धांत सुवर्णपदक; कोपरगावात सत्कार

 

कोपरगाव (प्रतिनिधी) – नाशिक येथे आयोजित ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स २०२६ स्पर्धेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल वाय. के. सुंबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन सुवर्णपदके पटकावली. ५ किलोमीटर धावणे, १५०० मीटर आणि ८०० मीटर या तिन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

एकाच स्पर्धेत प्रथमच तीन सुवर्णपदके मिळविण्याचा बहुमान सुंबे यांनी मिळवला. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या हस्ते सुंबे यांचा सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबईचे कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे, अक्षय काळे आणि गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आदींनी अभिनंदन केले.

वय हा केवळ आकडा असून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचा प्रेरणादायी संदेश सुंबे यांच्या यशातून मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 4 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे