साईबाबा मंदिरातील सुरक्षारक्षक श्रीमती कल्पना दळवी यांनी प्रामाणिकपणे गाभाऱ्यात सापडलेला सोन्याचा दागिना केला परत
साईबाबा मंदिरातील सुरक्षारक्षक श्रीमती कल्पना दळवी यांनी प्रामाणिकपणे गाभाऱ्यात सापडलेला सोन्याचा दागिना केला परत
शिर्डी :- प्रतिनिधी
दिनांक 15/8/2024 रोजी मंदिर महाद्वार महिला सुरक्षा रक्षक श्रीमती कल्पना दळवी यांना समाधी मंदिर गाभारा मध्ये एक नग सोन्याचे कानातील झुबा वजन-२.७०० ग्रॅम ( किंमत – 19440/- )सापडले ते त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले. तदनंतर साईभक्त यांनी संरक्षण ऑफिस ला येऊन दागिना हरविल्याची तक्रार केली असता, ओळख पटवून वरील किमतीचा सोन्याचा दागिना भक्तांना परत केला. नमूद महिला या कंत्राटी कर्मचारी म्हणून संस्थान मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या महिन्याच्या पगाराचे बरोबरीचे किमतीचे सोन्याचा दागिना त्यांनी कुठलाही मोह न ठेवता परत केले. प्रामाणिक महिला कर्मचारी यांचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी श्री गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवले यांनी अभिनंदन केले.
PSI श्री रोहिदास माळी ( साईबाबा मंदिर प्रमुख शिर्डी ) सरांनी श्रीमती कल्पना दळवी यांचे कौतुक करून सन्मान केला.