Breaking
ब्रेकिंग

सोशल मीडियाच्या या आभासी विश्वात आज एक सुंदर बातमी कळली …श्री गोरे सर

0 1 0 4 8 3

सोशल मीडियाच्या या आभासी विश्वात आज एक सुंदर बातमी कळली …

प्रज्ज्वलचा वाढदिवस…

नावातच ज्याच्या प्रकाशाचा अर्थ दडलेला … *प्रज्ज्वल* म्हणजे *तेजोमय* , प्रज्वलित, सतत उजळत राहणारा *दीप* .
आणि खरेच, तो फक्त नावाने नव्हे तर *कर्मानेही* *प्रज्ज्वलित* आहे.
योगाच्या साधनेतून ज्याने शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधला…
अत्यंत *नम्र, संयमी, आणि उत्कृष्ठ* योगाभ्यास करणारा हा साधक आज अनेकांच्या प्रेरणेचा *दीपस्तंभ* बनला आहे.
त्याच्या प्रत्येक *प्राणायामात* शिस्त आहे,
प्रत्येक *आसनामध्ये* स्थैर्य आहे,
आणि प्रत्येक ध्यानात *अंतर्मनाची* निर्मळ शांतता आहे.
तो जिथे जाईल तिथे योगाचा *प्रसार-प्रचार* करीत राहिला …
कधी शिबिरांतून,
कधी मार्गदर्शनातून,
तर कधी स्वतःच्या आचरणातून.
अनेक *पुरस्कारांनी* त्याचा गौरव झाला,
पण खरा पुरस्कार म्हणजे लोकांच्या जीवनात निर्माण झालेली आरोग्यदायी जागृती…
हेच त्याचे खरे यश!
योगाच्या भाषेत सांगायचे तर …
तो “ *समत्व योग उच्यते* ” या गीतेतील विचाराचा साक्षात प्रत्यय आहे.
*संतुलन* , *समर्पण* आणि *साधना* … या त्रिवेणी संगमात त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकच तेजस्वी झाले आहे.
*प्रिय प्रज्ज्वल* ,
तुझ्या जीवनाचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत राहो…
तुझ्या साधनेचा सुगंध अधिकाधिक जनांच्या आयुष्यात दरवळत राहो…
तुझे आयुष्य आरोग्य, आनंद, समाधान आणि यशाने परिपूर्ण होवो.
*वाढदिवसाच्या मनःपूर्वक, हृदयस्थ* आणि प्रेरणादायी शुभेच्छा!
तू असा *प्रकाशमान* राहा…
कारण तुझ्या तेजात अनेकांना त्यांच्या जीवनाचा मार्ग सापडतो.

                           श्री गोरे सर
🌹🍫🤝🙏

5/5 - (1 vote)

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 4 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे