साईबाबा संस्थानचे सुरक्षा सुपरवायझर नानासाहेब अहिरे यांचा प्रामाणिकपणा आला समोर
साईबाबा संस्थानचे सुरक्षा सुपरवायझर नानासाहेब अहिरे यांचा प्रामाणिकपणा आला समोर
शिर्डी :- प्रतिनिधी
दिनांक16 /08/2024 रोजी साईबाबा हॉस्पिटल मधील एक्स रे विभागाचे बाहेर श्री साईबाबा संस्थान चे सुरक्षा सुपरवायझर श्री. नानासाहेब अहिरे यांना एक पैशांचे पाकीट मिळून आले. त्यात 9420 रोख आणि एक युनियन बँकेचे एटीएम कार्ड होते. त्यांनी ते पाकीट प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिस ला जमा केले.
आज रोजी मी नमूद एटीएम कार्ड ची माहिती, यूनियन बँकेतील माझा मित्राकडून मागवली, ते पाकीट राजशेखर शिवाजीराव कुलकर्णी, रा. जालना यांचे असल्याचे समजले, बँकेतील मित्राने त्यान्चा मोबाईल नंबर पाठवला. त्यावर संपर्क केला असता, ते साईबाबा हॉस्पिटल चे जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट होते. तेथे जाऊन त्यांचे पैसे आणि कार्ड परत केले. तेव्हा ते म्हणाले कि, इथे एवढी गर्दी आहे कि, मला माझे पैसे परत भेटतील असे वाटले नव्हते, परंतु साईबाबानची लीला आहे. साईबाबा संस्थान चा मनापासून आभारी आहे, असे म्हणतांना ते क्षणभर भावुक झाले.
साईबाबा संस्थान सुरक्षा प्रमुख पीएसआय श्री रोहिदास माळी सर यांनी त्यांचा सन्मान केला व कौतुकाची थाप दिली