ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त करण्याची प्रधान सचिव वने महाराष्ट्र श्री वेणू गोपाल रेड्डी सर यांनी शाळेच्या मुले आणि उपस्थित पर्यावरण प्रेमी बरोबर घेतली शपथ
ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त करण्याची प्रधान सचिव वने महाराष्ट्र श्री वेणू गोपाल रेड्डी सर यांनी शाळेच्या मुले आणि उपस्थित पर्यावरण प्रेमी बरोबर घेतली शपथ
नाशिक :- प्रतिनिधी
नाशिक- नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी हरियाली गोदावरी की पवित्रता या ऐतिहासिक चळवळी मधील अभियानाला महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांनी समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन शाळेच्या लहान मुलांना बरोबर घेऊन ब्रह्मगिरी हरियाली गोदावरी पवित्रता या अभियानाला नुकतीच सुरुवात केली आहे.
या प्रसंगी प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, पंकज गर्ग , त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्की, नमामि गोदा फाउंडेशन अध्यक्ष राजेश पंडित, चला जाणूया नदीला चे ब्रँड अँबेसिडर सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, डॉ वॄश्नित सौदागर, मनोज साठे, सत्संग फाउंडेशनचे श्वेता मेनन, राजेश शिरोळे, शिट्टी मॅन चंद्रकांत पाटील, अपर्णा कोठावळे, दत्तात्रय ढगे, अमरीश मोरे, तेजस शिरसाट, वेदांत स्वामी, दीपक पाटील, सुभाष कुलकर्णी, भूषण शिनकर, बंटी पगारे, गंगाखेड येथील गोदावरी स्वच्छता अभियानाचे ऑड .राजु देशमुख, माणिकराव मुंडे, गोविंद पुरी, प्रतिभा वाघमारे, कशिश इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रधान सचिव रेड्डी यांनी
ब्रह्मगिरीला जिथून फेरीला सुरुवात होते त्या रस्त्यावरील दुकानदारांना मोठे मोठे डस्टबिन देण्यात आले आणि सर्व प्लास्टिकचा जो कचरा आहे तो त्या डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी भाविकांना त्यांना विनंती करायला लावली. तर सत्संग फाउंडेशन नमामिगोदा यांचे संयुक्त चळवळ अविरल गोदावरी अंतर्गत ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त मोहिमेसाठी तसेच धम्मगिरीवर पुन्हा एकदा पूर्वीसारखे जंगल निर्माण करणे प्राचीन कुंडांचे पुनर्जीवन करणे औषधी वनस्पती लावणे माती वाहून जाण्यापासून वाचविणे जमिनीमध्ये पाणी मुरवणे यासारख्या अनेक उपक्रमाची सुरुवात श्री वेणू गोपाल रेड्डी सर यांनी शपथ घेऊन केली.
या प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव च्या अंतर्गत पाच वर्षापासून अविरल पणे जे स्वच्छता अभियान सुरू आहे त्याची माहिती प्रधान सचिव रेड्डी यांना ट्रस्ट चे संस्थापाक आदिनाथ ढाकणे यांनी दिली असता त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के आणि प्रधान सचिव वने वेणू गोपाल रेड्डी यांनी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी अविरल गोदावरी अंतर्गत उपक्रमासाठी सत्संग फाउंडेशनचे सर्व सदस्य नमामि गोदा फाउंडेशन चे सर्व सदस्य गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे सर्व सदस्य नाशिक मधील ज्या शाळा सहभागी झाल्या त्या शाळेतील मुलांची व स्टाफचे त्र्यंबकेश्वर नगर परिषद कर्मचारी राणी नागरिकांचे व गंगाखेड येथील गोदामाई स्वच्छता अभियान राबविणारी टीम सहित सर्वाचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ब्रह्मगिरी प्लास्टिक मुक्तीची शाळेच्या मुलांसमवेत सर्व पर्यावरण प्रेमींच्या समवेत श्री रेड्डी सरांनी शपथ घेतली.