महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने पद्मा मेहता शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने पद्मा मेहता शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने पद्मा मेहता शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न
कोपरगाव :- प्रतिनिधी
शहर व तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शहरातील रयत शिक्षण संस्थेचे पद्मा मेहता प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सचिव विजय कापसे, शहराध्यक्ष हाफिज शेख, उप शहराध्यक्ष स्वप्निल कोपरे, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, विनोद जवरे, राजेंद्र तासकर, अक्षय काळे, गोविंद वाकचौरे, अमोल गायकवाड यांचे सह संघटनेचे सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
सदरची रांगोळी स्पर्धा ही लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली या स्पर्धेमध्ये ३० विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन विविध प्रकारे रंग भरून अत्यंत सुबक पद्धतीने रांगोळ्या साकारल्या होत्या. सदर रांगोळ्याचे निरीक्षण व परीक्षण शाळेच्या शिक्षिका श्रीमती.रंजना गवळी, सौ.मनीषा खळदकर, सौ संगीता दरेकर, श्रीमती उज्वला वदक, श्रीमती मीना निर्मळ, सौ सुनीता क्षीरसागर, सौ वंदना खर्डे, श्रीमती मंगला आव्हाड, सौ ज्योती आरोटे, सौ शुभांगी शेळके यांनी सर्व रांगोळीचे परीक्षण करून यामध्ये उत्कृष्ट कलाकृती व सुबक रांगोळी साकारणाऱ्या मुलींची यादी निश्चित करून त्यानंतर सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत परीक्षण करून प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक काढून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये लहान गट व मोठा गटाचा निकाल उपस्थित पत्रकारांच्या उपस्थितीत काढण्यात आला. यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक हर्षिका दिपक वाघ, द्वितीय क्रमांक स्पृहा स्वप्निल खडांगळे व तृतीय क्रमांक आरजू पठाण या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तर मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक समीक्षा सोनवणे, द्वितीय क्रमांक दिक्षा जाधव, तृतीय क्रमांक गौरी चव्हाण या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तर सहभागी झालेल्या उत्तेजनार्थ ३० विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रा.विजय कापसे व शहर कार्याध्यक्ष बिपीन गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ.शुभांगी शेळके यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.