Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्रातील दोन अर्जुन पुरस्कार विजेते आणि दोघेही बुद्धिबळपटू

विदित गुजराथींच्या यशाने कोपरगावकरांची मान उंचावली

0 1 1 7 3 9

महाराष्ट्रातील दोन अर्जुन पुरस्कार विजेते आणि दोघेही बुद्धिबळपटू

🏆 विदित गुजराथींच्या यशाने कोपरगावकरांची मान उंचावली

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने, संयमाने आणि सातत्यपूर्ण कामगिरीने देशाच्या क्रीडा विश्वात वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हे यंदाचे महाराष्ट्रातील अर्जुन पुरस्कार सन्मानित खेळाडू असून दोघेही बुद्धिबळपटू आहेत. या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्राचा लौकिक देशभरात पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
♟️ *कोपरगावशी जुळलेली विदित यांच्या यशाची नाळ*

✍️ महेश थोरात ✍️

विदित संतोष गुजराथी हे नाव आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वात अत्यंत मानाचे आहे. मात्र त्यांच्या या यशामागे कोपरगावशी जोडलेली एक जिव्हाळ्याची नाळ आहे. कोपरगावच्या शिवाजी रोडवरील राजकुमार मेडिकल स्टोअरचे मालक डॉ. संतोष गुजराथी यांचे ते चिरंजीव आहेत. डॉ. संतोष गुजराथी सध्या नाशिक येथे कायमस्वरूपी स्थायिक झाले असले, तरी विदित यांच्या यशामुळे कोपरगावशी असलेले त्यांचे नाते आज पुन्हा अभिमानाने चर्चेत आले आहे.
एकेकाळी कोपरगावच्या परिचित परिसराशी जोडलेले हे कुटुंब आणि त्यांचा सुपुत्र आज देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला आहे, ही प्रत्येक कोपरगावकरासाठी अभिमानाची बाब आहे.
🏆 *विदित गुजराथी यांनी जानेवारी २०१३ मध्ये ग्रँडमास्टर किताब पटकावत भारताचे ३० वे ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला.* महाराष्ट्रातून ग्रँडमास्टर किताब मिळविणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
इतकेच नव्हे, तर २७०० एलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारे ते भारताचे चौथे बुद्धिबळपटू ठरले. हा टप्पा जागतिक बुद्धिबळातील अभिजात खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवण्याचे प्रतीक मानला जातो.
विदित यांच्या कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद कामगिरींपैकी एक म्हणजे *बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील दोन सुवर्णपदके.* भारतीय बुद्धिबळ संघाच्या ऐतिहासिक यशात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताच्या बुद्धिबळ महासत्ता म्हणून होत असलेल्या वाटचालीला मोठी ताकद मिळाली.
याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविण्याचा मानही विदित यांच्या नावावर आहे. त्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना येते.
विदित गुजराथी यांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक अध्याय म्हणजे २०२३ मधील FIDE Grand Swiss स्पर्धेतील विजेतेपद.
या स्पर्धेत विदित यांनी तब्बल ८.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावत विजेतेपद मिळवले. या विजयामुळे त्यांनी Candidates Tournament साठी पात्रता मिळवली आणि कँडिडेट्स स्पर्धेत पात्र ठरणारे भारताचे तिसरे खेळाडू बनण्याचा मान मिळवला.
ही कामगिरी त्यांच्या कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरली आणि जगातील अव्वल बुद्धिबळपटूंच्या यादीत विदित यांचे स्थान अधिक भक्कम झाले.
*विदित गुजराथी यांचा प्रवास हा केवळ एका बुद्धिबळपटूच्या यशाची कहाणी नाही तो स्वप्न, मेहनत, सातत्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर उंच भरारी घेणाऱ्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.*
👑 *दिव्या देशमुख यांच्या रूपाने महाराष्ट्राला दुसरा अभिमान*
विदित यांच्यासोबत ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनाही अर्जुन पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरच्या दिव्या देशमुख यांनी 2025 मध्ये महिला विश्वचषक जिंकत ग्रँडमास्टर किताब मिळवला. त्या स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीमुळे त्या भारतीय बुद्धिबळातील नव्या पिढीच्या सर्वाधिक चर्चिलेल्या खेळाडूंपैकी एक ठरल्या आहेत.
म्हणजेच यंदा *महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वात ‘दोन खेळाडू दोघेही बुद्धिबळपटू’ अशी अनोखी आणि अभिमानास्पद नोंद झाली आहे.*
🏆*अभिनंदन विदित! अभिनंदन दिव्या*
बुद्धिबळाच्या पटावरची प्रत्येक चाल विचारपूर्वक असते. विजयासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते त्यासाठी एकाग्रता, संयम, अभ्यास, दूरदृष्टी आणि सातत्य आवश्यक असते. विदित गुजराथी यांनी या सर्व गुणांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आणि आता अर्जुन पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
*कोपरगावच्या भूमीशी नाते असलेल्या या गुणी सुपुत्राचे मनःपूर्वक अभिनंदन*
👑*ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!*
अभिनंदन कोपरगावकरांनो!
अभिनंदन महाराष्ट्राच्या बुद्धिबळविश्वाला! ♟️🏆

✍️महेश थोरात ✍️
कोपरगाव नगरपरिषद संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 7 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे