यश सांगळे यास राज्यस्तरीय थांग ता मार्शल आर्टस्पर्धेत सुवर्ण पदक
यश सांगळे यास राज्यस्तरीय थांग ता मार्शल आर्टस्पर्धेत सुवर्ण पदक
कोपरगाव :- प्रतिनिधी
दिनांक 16 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत सेवाग्राम जिल्हा – वर्धा येथे 28 वी राज्यस्तरीय थांग ता मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..सदर स्पर्धेत संपर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता.. संपर्ण राज्यातून जवळपास 400 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते..थांग ता मार्शल आर्ट राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री महावीर दुळधर सर याच्या हस्ते विजयी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले..अहमनगर जिल्ह्यातून 24 मुला – मुलींचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता..यात कोपरगाव शहरातील यश सांगळे याने आपल्या वय आणि वजन गटात सुवर्ण पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.. जर यशने राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळविले तर त्याची ‘ खेलो इंडिया ‘ स्पर्धेसाठी निवड होणार आहे.. यशला अहमदनगर जिल्हा थांग ता मार्शल आर्ट संघटनेचे सचिव – प्रा. सुदर्शन पांढरे सर यांचे मार्गदर्शन मिळाले..
जय गोदामाई………!
जय त्र्यंबकराज……..!!
जय शुक्राचार्य………..!!!