Breaking
ब्रेकिंग

स्वावलंबी आर्थिक सुबत्तायुवा उद्योजकता आणि सहकाराला नवसंजीवनी देणारा कर्मयोगी — स्व.शंकरराव कोल्हे साहेब

0 1 0 4 8 3

स्वावलंबी आर्थिक सुबत्तायुवा उद्योजकता आणि सहकाराला नवसंजीवनी देणारा कर्मयोगी — स्व.शंकरराव कोल्हे साहेब

 कोपरगाव :- प्रतिनिधी 

सहकार म्हणजे केवळ साखर कारखाना नव्हे, तर सहकार म्हणजे ‘सामूहिक श्रमदानातील देशाला स्वावलंबी आर्थिक समृद्धी मिळवून देणारे क्रांतिकारी व्यवस्थापन साधन’ !
ह्याच संकल्पनेला कायमस्वरूपी बळकटी देवून कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांनी कोपरगांव तालुका भारतीय कॅलिफोर्निया निर्मितीचा घाट घातला आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ग्रामीण तरुणांसमोर रोजगाराचे मोठे आव्हान असताना, सहकार महर्षी कोल्हे साहेबांनी सहकार आणि शैक्षणिक सुबत्तेचा रचिला पाया l याच पावलावर पाऊल ठेवून कोल्हे साहेब यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढी ने संजीवनी’ उद्योग व संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या माध्यमातून सहकारी व शैक्षणिक सुबत्तेचा घडविला कळस!या संकल्पनेतून सहकारी युवा उद्योजकतेचे एक स्वावलंबी मॉडेल उभे केले.
कोल्हे साहेबांनी शिक्षणाला उद्योजकतेची जोड दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ग्रामीण तरुण आज केवळ नोकरी मागणारा उरला नसून, तो ‘नोकरी देणारा’ उद्योजक बनत आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना बळ देणे, प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि तरुणांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणे, ही साहेबांची दूरदृष्टी होती.
साखर कारखान्यातील उप-पदार्थ निर्मिती (By-products) जसे की इथॅनॉल आणि वीज निर्मिती, हे केवळ तांत्रिक प्रकल्प नसून ते युवा तंत्रज्ञांसाठी रोजगाराचे नवीन दरवाजे आहेत. संजीवनी कारखान्याचे चेअरमन श्री विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीने (सी.एन.जी) गॅस चे दररोज दहा ते बारा टन उत्पादन आज होत आहे व विक्रीत केले जात आहे. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत या गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे. सहकाराच्या माध्यमातून भांडवल आणि तरुणांची बुद्धिमत्ता एकत्र आली, तर आर्थिक सुबत्ता कशी येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगावचा संजीवनी ग्रामीण शैक्षणिक व उद्योग समूहाचे डोळे दिपवून टाकणारे आगळे वेगळे चैतन्य दायी कार्य. “युवाशक्तीच्या हाताला काम आणि घामाला दाम” देणारी ही स्वावलंबी सहकारी चळवळ खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्याचा ‘दीपस्तंभ’ ठरली आहे. साहेबांनी पेरलेला हा उद्योजकतेचा विचार आजच्या पिढीला स्वाभिमानाने जगण्याचे बळ देत आहे. ह्याच संकल्पनेला प्रत्यक्षात आकार देणाऱ्या कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन!!!

 

    जेष्ठ व्यापारी नारायणशेठ अग्रवाल कोपरगांव
मो.9822630330

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 4 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे