सन्मान योगसेवेचा सामाजिक जाणीवेचा :- या पुरस्काराने प्रज्वल ढाकणे सन्मानित.
सन्मान योगसेवेचा सामाजिक जाणीवेचा :-या पुरस्काराने प्रज्वल ढाकणे सन्मानित
कोपरगाव :- प्रतिनिधी
अहिल्यानगर येथील स्नेहालय या ठिकाणी योगशिक्षक प्रज्वल अजिनाथ ढाकणे याला सन्मान योग सेवेचा सामाजिक जाणीवेचा हा पुरस्कार व मानचिन्ह देऊन शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते प्रज्वल ढाकणे ला सन्मानित करण्यात आलं.
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट अंतर्गत आई गोदावरीची स्वच्छता अभियान ( 275 आठवड्यापासून )दर रविवारी कोपरगाव शहरामध्ये गोदामाई सेवक करत असतात या सेवेमध्ये प्रज्वल ढाकणे याचा खूप मोठा वाटा आहे त्याचबरोबर कोपरगाव येथील शाळा कॉलेज मध्ये योगासनाचे मोफत सेवा देत असतो.
यावेळी पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. गिरीश कुलकर्णी ( संस्थापक स्नेहालय संस्था ) सर्वश्री प्रमोद कांबळे, विकास कांबळे, प्रणिता बोरा, बालाजी बल्लाळ आदी आहिल्यानगर मधील शिल्पकार, चित्रकार आणि स्नेहालयासाठी काम करणारे सर्व स्वयंसेवक मित्रपरिवार उपस्थित होता.
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आणि मित्र परिवाराकडून प्रज्वल ढाकणे चे कौतुक होत आहे.
जय गोदामाई……….!
जय त्र्यंबकराज………!!
जय शुक्राचार्य………..!!!