
लिनेस क्लब ऑफ कोपरगाव तर्फे विद्या प्रबोधिनी शाळेमध्ये श्लोक पाठांतर स्पर्धांचे आयोजन….
लिनेस क्लब ऑफ कोपरगाव तर्फे विद्या प्रबोधिनी शाळेमध्ये श्लोक पाठांतर स्पर्धांचे आयोजन…..
कोपरगाव :- प्रतिनिधी
लिनेस क्लब ऑफ कोपरगाव ही एक सामाजिक संस्था असून या संस्थेद्वारे दरवर्षी कोपरगाव मध्ये विविध प्रकारचे उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण विषयक उपक्रमांचा समावेश असतो.
शालेय मुलांचा बौद्धिक,भावनिक, आणि शारीरिक विकास व्हावा या दृष्टीने *एक कदम शिक्षा की ओर* या ब्रीदवाक्याने सण 2025 मध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून, आबासाहेब पटवर्धन शिशु विकास विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये गणपती स्तोत्र पठण,रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र घेण्यात आले.
यावेळी लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.आणि उस्फुर्त प्रतिसाद ही मिळाला.यावेळी लिनेस क्लब च्या अध्यक्ष सौ.अंजली थोरे,सचिव सोनाली गिरमे खजिनदार सरिता चोप्रा तसेच क्लब च्या ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सौ.वर्षा झंवर, सौ भावना गवांदे प्रकल्प प्रमुख गायत्री कुलकर्णी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गौळी,माधुरी कुलकर्णी सीमा हिरे तर शुभदा देशमानकर मनीषा भास्कर व इतर शिक्षक उपस्थित होते.श्लोक स्पर्धेमुळे मुलांचा बौद्धिक विकास तर होईलच तसेच भारतीय संस्कृती चे जतन ही साध्य होणार आहे म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे प्रतिपादन लीनेस क्लब ऑफ कोपरगाव च्या अध्यक्षा सौ अंजली थोरे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शेटे यांनी केले.