वारीत दिवाळीनिमित्त राहुल दादा मधुकरराव टेके पाटील ट्रस्टकडून ७१ योग्य व्यक्तींना वस्त्र व मिठाई वाटप….!
वारीत दिवाळीनिमित्त राहुल दादा मधुकरराव टेके पाटील ट्रस्टकडून ७१ योग्य व्यक्तींना वस्त्र व मिठाई वाटप….!
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे सालाबादप्रमाणे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त बुधवारी (दि.३०) ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारी परिसरातील जवळपास ७१ लाभार्थ्यांना आमचे कुटुंबप्रमुख मा. श्री. राजेशजी (आबा) परजणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन वस्त्र व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. मच्छिंद्र टेके पाटील होते. यावेळी आदरणीय आबांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच राहुल दादाच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी उपसरपंच रामदासजी सोनवणे, माजी सरपंच हिंमतराव भुजंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल दादाच्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. या उपक्रमात कोपरगाव येथील माझे मित्र तथा सुंदरम साडी, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर चे संचालक प्रदीपशेठ भंडारी यांचे विषेश सहकार्य लाभले.*
*या कार्यक्रमासाठी सर्वश्री बाजार समितीचे माजी सभापती मधुकर तात्या टेके पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाशभाऊ गोर्डे, माजी सरपंच हिंमतराव भुजंग, सतीशराव कानडे, माजी उपसरपंच रामदासजी सोनवणे, विद्यमान उपसरपंच विजयभाऊ गायकवाड, सदस्य अनिल गोरे, विशाल गोर्डे, वाल्मिक जाधव, दौलत वाईकर, योगेश झालटे, प्रणाली देशमुख, हिमांशू त्रिवेदी, डॉ. निलाक्षी फुसे, डॉ. आंचल गांधी, मार्गदर्शक नरेंद्रशेठ ललवाणी, मदन काकाजी काबरा, अशोकराव सोपानराव टेके, तान्हाजी थोरमिसे, उत्तमराव वाकचौरे, दिलीपराव गडकरी, राजुभाऊ मुरार, गणेशभाऊ भाटी, बापूराव बहीरमल, संतोष भाटे, दिपक झालटे, दिनेश निकम, रामक्रुशन तायडे, विजय ठाकरे, फकिरा चंदनशिव, जनार्दन औंसरमोल, किसन पगारे, हुसेन शेख, स्मिता काकीजी काबरा, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, दिलीप देशमुख, विलास गोंडे, शंकर महाराज गोंडे, मधुकर सोनवणे, स्वप्निल टेके, अजिम शेख, अशोक निळे, रघुनाथ आहेर, महेंद्र महाले, भिमा तपासे, जयसिंग बनगैया, राहुल जाधव, ओंकार वाईकर, नामू शिंदे, आकाश निळे, अविनाश दुशिग, आदित्य निळे, केतन भारूड, राहुल त्रिभुवन, युन्नुस शेख, साहिल शेख, योगेश माने, सुंदर पगारे, चेतन सुरासे, शंकर धामणे, भैय्या रोकडे, सक्षम आवारे, अमित झालटे, किरण टेके यांच्यासह ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक, राहुल (दादा)मित्र मंडळाचे सर्व सदस्य, राहुल दादावर प्रेम करणारे प्रभाग क्रमांक चार तसेच वारी गावातील सर्व कौटुंबिक सदस्य, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी माझे परममित्र तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष अरुणजी कदम हे राहुल दादाच्या व व्यक्तिशः माझ्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार रोहित टेके यांनी तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख आप्पा टेके यांनी आभार मानले.