प्रयागराज येथील कुंभमेळा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक थाळी एक थैली अभियान सुरू
प्रयागराज येथील कुंभमेळा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक थाळी एक थैली योजना सुरू
प्रयागराज येथे जानेवारी/फेब्रुवारी २०२५मध्ये १४४ वर्षांनी येणारा महाकुंभमेळा संपन्न होत आहे. या महा कुंभमेळ्यासाठी सर्व जगभरातून सुमारे ४० कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.
या कुंभमेळ्यासाठी राज्य तसेच देश पातळीवर जय्यत तयारी चालू आहे .
या ठिकाणी प्लास्टिकचा व, वापरा आणि फेकून द्या अशा वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग केला जाऊ शकतो.
यासाठी अखिल भारतीय स्तरावर पर्यावरण गतिविधिने एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत एक थैली(कापडी) एक थाळी(स्टील) अभियान संपूर्ण देशभर राबविले जात आहे.
एक थाळी एक थैली प्रत्यक्ष आपणास तिथे पोहोचवणे शक्य नसल्याने प्रत्येक नागरिकांनी रुपये १२५ चे योगदान करून या अभियानास हातभार लावावा. रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. रक्कम खालील लिंक वर जमा करावी. https://pages.razorpay.com/tta2024
ज्यांना जास्त प्रमाणात थाळी आणि थैली प्रत्यक्ष द्यायचे आहेत त्यांनी खालील पत्त्यावर त्या पाठवल्या तरी चालतील.
डॉ अमित पाण्डेय
“भूषण भवन”
787/95/87 सर्वोदय नगर, अल्लापुर,अमिताभ बच्चन रोड, प्रयागराज उत्तर प्रदेश
पिन – २११००६
संपर्क क्रमांक – ९३३५०११११७
दिनांक ६ डिसेंबर २०२४ पर्यंत,पश्चिम महाराष्ट्र प्रांत मधील,एकूण १६ जिल्ह्यामध्ये ८३५३ देणगीदार यांनी, ३८,३४८ थाळी थैली करिता, ₹४७,९३,५०० जमा केले आहेत. तसेच,दिनांक ६ डिसेंबर २०२४ पर्यंत, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामधून एकूण, ७ तालुक्यातून, १९७ देणगीदार यांनी,८४४ थाळी थैली करिता, ₹ १,०५,५०० जमा केले आहेत.
हे ईश्वरी कार्य आहे, त्यात आपला आपल्या कुटुंबाच्या व आपल्या परिसरातील व्यक्तींचा खारीचा वाटा नक्की असावा त्याकरिता वरील माहिती पाठवत आहे.
संयोजक
पर्यावरण गतिविधि उत्तर नगर जिल्हा
डॉ भास्कर चंद्रकांत कुलकर्णी, राहुरी.(९९२२१९३२१६)
वरील फोनवर व्हाट्सअप मेसेज केला तरी आपणास लिंक मिळू शकते.