वृक्षमित्र फाऊंडेशनकडून गाव- शिवार उपक्रमांतर्गत दोडी येथे वृक्षारोपण
वृक्षमित्र फाऊंडेशनकडून गाव- शिवार उपक्रमांतर्गत दोडी येथे वृक्षारोपण
सिन्नर :- प्रतिनिधी
निसर्ग हीच संपत्ती आहे तोच आपल्या भावी पिढीसाठी ठेवा आहे म्हणून वाढदिवस असो सेवानिवृत्ती असो कुठलाही समारंभ असो त्याची सुरुवात जर प्रत्येकाने वृक्षारोपण करून केली तर निसर्गाचे जतन नक्कीच होईल. आज 30 जून रोजी दोडी बु येथे बस स्टॅण्ड ते साईबाबा मंदिर परिसरात वृक्षमित्र फाऊंडेशनने गाव शिवार ह्या उपक्रमांतर्गत वटवृक्ष वड, ऑक्सिजन मित्र पिंपळ, घनदाट सावली देणारी आंबट चिंच, शिसव, बकुळ, अशोक, आदी वृक्षांचे वृक्षारोपण केले. वृक्षमित्र फाऊंडेशनच्या खजिनदार रोहिणी सांगळे यांनी वृक्षरोपांचे सौजन्य कन्या सानिध्याच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने व मुख्याध्यापक श्री अशोक सांगळे, एसटी वाहक रमेश उगले , लिपिक शांताराम सांगळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने दिले, तर खड्डे खोदण्यासाठी विशाल जाधव व मनोज वैद्य यांनी मोलाचे सहकार्य केले.
वृक्षारोपण प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, ब्रह्मनंद प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडूशेठ केदार, राजाराम आव्हाड, वृक्षमित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वृक्षमित्र विष्णू वाघ, पी. डी. विंचू, तुकाराम आव्हाड, रामदास सांगळे, जयप्रकाश केदार, कृष्णा वाघ, नवनाथ सांगळे, तानाजी वाघ, तुकाराम केदार, संपत शेळके, अरुण आव्हाड, संजय सांगळे, कैलास घुगे, बाळासाहेब केदार, शंकर आव्हाड तसेच समस्त गावकरी, शिक्षक वर्ग व वृक्षमित्र परिवार उपस्थित होते.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य