जल जीवन आहे व वृक्ष जीवनाचा आधार आहे, म्हणूनच म्हणतो झाडं सांभाळा ,संगोपन करा
जल जीवन आहे व वृक्ष जीवनाचा आधार आहे, म्हणूनच म्हणतो झाडं सांभाळा ,संगोपन करा
प्रतिनिधी :- येवला
या फोटोमधील छोटं रोपट त्याच्या मुळांच्या माध्यमातून किती माती अडवून धरू शकतो हे समजून घेता येईल.
आणि याच मुळांच्या व मातीच्या माध्यमातून पाणी अडवण्याची व पाण्याची धारण क्षमता दोन्हीही वाढेल
पाण्याची धारण क्षमता वाढवणं का गरजेचं आहे तर त्या माध्यमातून भूगर्भात पाणी साठवणे सहज सोपे होते.
कारण सध्या खालावत चाललेला जालस्थर हा भविष्यातील गहन चिंतेचा विषय ठरणार आहे.कारण हा बदल इतका शिग्रतेने होतोय की आजोबांच्या वेळी ज्या विहिरीला 25 फुटावर पाणी लागायचं, तोच जलस्थर वडिलांच्या काळात 40 फुटावर गेला अन आता मुलांच्या काळात 50 ते 70 फूट झाला आहे.
अश्याच प्रकारे जलस्थर खालावत राहिला तर पुढच्या 15 ते 20 वर्षात 100 फुटावर ही पाणी मिळणार नाही व आपल्या जलसमृद्ध नाशिक च बंगलोर व चेन्नई व्हायला वेळ लागणार नाही.
वाढत जाणारी कुटुंब व त्याप्रमाणे विभागली जाणारी शेती शेतीच्या प्रत्येक विभाजनानंतर तयार होणारी नवीन विहीर किंवा बोरवेल या सगळ्यांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा उपसा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण त्या तुलनेत भूगर्भाला पाणी पोहोचत नाहीये म्हणजेच भूगर्भाचं पुनर्भरण होत नाहीये.
मग याला पर्याय काय, तर भूगर्भाच्या पाण्याचं पुनर्भरण होत राहणं गरजेचं आहे
ज्याप्रमाणे आपण बँकेतून पैसे तेव्हाच काढू शकतो जेव्हा आधी आपण त्या बँकेत पैसे जमा केलेले असतील.
त्याचप्रमाने गवत, व वृक्षांच्या माध्यमातून आपण भूगर्भाला
पाणी जमा करत राहिलो तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना पाणी मिळेल
पण भूगर्भाच्या पाण्याचं पुनर्भरण करणे ही संथ गतीने होत जाणारी प्रक्रिया आहे ,आज पडलेल्या पावसाचं पाणी कित्येक वर्षानंतर भूगर्भाच्या शेवटच्या स्थरापर्यंत पोहचल्या जातं.
त्यामुळे आपल्याला अधिक प्रयत्न करून पाणी आडवा पाणी जिरवा या गोष्टीवर भर द्यावा लागेल
आज सुरू केलेल्या प्रयत्नांना जर योग्य गती मिळालीच, तर किमान 5 वर्षानंतर अपेक्षित परिणाम दिसतील
पण त्यासाठी प्रत्येक स्थरावर मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन फक्त यांचा उपक्रम नको
हा प्रयत्न तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा हे काम प्रत्येक संस्था जसे शाळा, शासकीय व निम शासकीय कार्यालय व निवासी संकुल व प्रत्येक व्यक्ती हे स्वतः प्रयत्न करतील
कारण पाण्याला जात धर्म पक्ष हा कोणताही भेदभाव नाही
पाणी हे जीवन आहे हे फक्त म्हणणं वेगळं अन यांसाठी कृती करणं वेगळं.
बाकी सर्व गोष्टींपेक्षा सरकारी स्थरावर या गोष्टीसाठी विशेष प्रयत्न होऊन जनजागृती होईल तेव्हाच सर्वसामान्य शेतकरी व नागरिक यासाठी प्रयत्न करेल
यात सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्यस्त कामकाजात अडकलेल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला निसर्गसेवेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे
कारण निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाला काही न काही करावसं वाटत पण त्यांना व्यस्ततेत सुचत नाही की नेमकं काय कारावं
जर अश्या लोकांसाठी व्यासपीठ उपलब्ध झालं तर हा वर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणू शकतो
अन याच सर्व नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करतेय नाशिक ची पर्यावरण चळवळ व त्यात असणारा प्रत्येक व्यक्ती.
प्रत्येक मनात व प्रत्येक घरात झाड लागावं यासाठी प्रत्येक घरात झाड संगोपनासाठी देऊन त्याची योग्य वाढ करून योग्य जागी लावण्याचं काम सुरू आहे.
या सर्वांच्या प्रयत्नांना यश येईल व लवकरच सर्वांसमोर एक आदर्शवत काम उभं राहिलं अशी अपेक्षा आहे.
जय हरी????????
???? निसर्गसेवक????
श्री मनोज विजय साठे.