Breaking
ब्रेकिंग

उदगीर नगरपरिषद द्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी

0 0 4 7 8 9

 

उदगीर नगरपरिषद द्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी

उदगीर :- प्रतिनिधी

मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी उदगीर शहरातील पर्यावरण संवर्धन व वृक्षप्रेमी व्यक्ती, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांना साद घालत दिनांक २० जुन २०२४ रोजी प्रशासक सुशांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. सदर बैठकीस लाल बहादूर शास्त्री, शामलाल मेमोरीअर विद्यालय, मातृभूमी, शिवाजी, श्री हावगी स्वामी, महाराष्ट्र उदयगिरी, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, सामाजिक संस्था हरित वसुंधरा ग्रुप, कारवा फाउंडेशन, जेष्ठ नागरिक संघ, आंतरभारती, रोटी कपडा बँक, मराठवाडा जनता विकास परिषद, रोटरी क्लब, लायन्स क्लब, विधिज्ञ संघ, नागरिक, माजी गटनेते इ. उपस्थित होते. सदर बैठकीत उदगीर शहर हरित करणे कामी शहरात कोठे कोणते वृक्ष लावणे, खुल्याजागा, पाणी व्यवस्था, तसेच शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांनी विविध भाग दत्तक घेवून वृक्षसंवर्धन जबाबदारी घ्यावी इत्यादी विषयावर सविस्तरपणे चर्चा झाली.


सदर बैठकीत ठरल्याप्रमाणे दि.२६ जुन २०२४ रोजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० जयंती निमित्ताने कमीतकमी १५० वृक्ष लावून साजरी करूया त्यानुसार आज इदगा मैदान परिसरात ६७ चिंचेचे, यनकी मानकी रोड दोन्ही बाजूस ८० लिंब, अंबा, करंज, कांचन तसेच रिंग रोड सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात ४० लिंब, अंबा, करंज, कांचन असे एकूण १८७ वृक्ष लागवड करण्यात आली.


यावेळी मुख्याधिकारी सुंदर बोंदर, प्रशासक सुशांत शिंदे यांच्या सह सामाजिक संस्थेचे मिशन ग्रीन उदगीर, कारवा फाउंडेशन, जेष्ठ नागरिक संघ, रोटी कपडा बँक, आंतरभारती यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे