माजी आमदार कै. के. बी रोहमारे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 – 25
माजी आमदार कै. के. बी रोहमारे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 – 25
माजी आमदार कै. के. बी रोहमारे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 – 25
माजी आमदार कै. के. बी रोहमारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 24, 25 व 26 जानेवारी, 2025 रोजी के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे राज्यस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा सहा गटासाठी घेण्यात येणार आहे. यात 15 व 19 वर्षाखाली मुले व मुली सिंगल्स, महिला डबल्स, मिक्स डबल्स, पुरुष डबल्स व 35 वर्षावरील पुरुष डबल्स गटासाठी असून ही बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पीयू सिंथेटिक कोर्टवर कळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून अंदाज ८० संघ सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
या स्पर्धेसाठी एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच बेस्ट प्लेयर महिला व पुरुष असेही इतर पारितोषिक देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना लि. गौतमनगर हे असणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोपरगावातील सर्व बॅडमिंटन प्रेमी प्रयत्नशील आहे. इच्छुक स्पर्धकांनी डॉ सुनील कुटे ९६०४०४०३८३, श्री. सागर रोडे ९४०३९६९९६४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संदीपजी रोहमारे व के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सी. ठाणगे यांनी केले.





