हेल्पिंग हँड्स या संस्थेचे काम गौरवस्पद :- प्रकाश जमधडे
कोपरगाव :- प्रतिनिधी
आयुष्याच्या अडचणीच्या काळात ज्या सामाजिक संस्थानी, समाजाने आपल्याला मदत केली त्यांचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने मागे वळून पाहिले पाहिजे. समाजातील आर्थिकदुर्बल ,गरीब ,हुशार होतकरू विद्यार्थांना मदतीचा हात देण्याचे सीए दत्तात्रेय खेमनर यांचे “हेल्पिंग हॅंडस”संस्थेचे काम गौरवास्पद आहे असे उद्गार महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी केले.
“हेल्पिंग हॅंडस “संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील विद्यार्थांना हॉस्टेल फी, किंवा मेस बिलासाठी प्रत्येकी वीस हजार रुपयांची मदत देण्यात येते त्या रक्कमेच्या धनादेश वाटप प्रसंगी जमधडे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे होते. व्यासपीठावर माजी विद्यार्थी गौरव पाचपिंड,डॉ. गोवर्धन हुसळे ,प्रा. गणेश देशमुख, भालचंद्र विभूते होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. गोवर्धन हुसळे यांनी करून दिला.
प्रास्ताविकात हेल्पिंग हॅंडस चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय खेमनर म्हणाले, संस्थेने गेल्या पंधरा वर्षात १२७ विद्यार्थांना ६१ लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली आहे. समाजातील दानशुरांच्या बळावर संस्थेच्या कार्याचा हा यज्ञ तेवत आहे. लाभार्थी विद्यार्थां देखील नौकरी लागल्यानंतर संस्थेच्या या वटवृक्षाला आर्थिक हातभार लावत आहेत. माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यावेळी म्हणाले,प्रत्येक विद्यार्थां आज डॉक्टर, इंजिनीअरिंगला प्राधान्य देत आहे. मात्र संशोधन करण्यामध्ये विद्यार्थी मागे पडत आहे.संशोधक प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्याना समाजासाठी नेमके कोणते कार्य करावे, व समाजातील शेवटच्या गरजूंसाठी निस्वार्थीपणे काम करणे हे सुचणे देखील अवघड आहे. अशावेळी हेल्पिंग हॅंडस गेल्या पंधरा वर्षापासून करीत असलेले सामाजिक काम निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी प्रकाश जमधडे यांनी २५०००/- तर श्री.जितेंदर उघडे यांनी ९९९९/- रुपयांची देणगी संस्थेस दिली. डॉ. गोवर्धन हुसळे यांनी तीन विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी यावेळी घेतली. सामाजिक कार्यकर्ते भाऊ थोरात,प्रा. अविनाश घैसास, विठ्ठलराव शिंदे, डॉ. भाऊसाहेब निघोट ,श्रीनिवास खरवंडीकर,अण्णासाहेब बावके,गणेश सोनवणे, विजय सांगळे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर कोयटे यांनी केले.
जय गोदामाई …….!
जय त्र्यंबकराज ……!!
जय शुक्राचार्य ……..!!!