प्रज्वल ढाकणेने जिल्हास्तरीय योग स्पर्धेत दोन गोल्ड व एक सिल्वर मेडल वैष्णवी ढाकणे ने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत केले यश संपादन
प्रज्वल ढाकणेने जिल्हास्तरीय योग स्पर्धेत दोन गोल्ड व एक सिल्वर मेडल मिळवत केले यश संपादन
कोपरगाव :- प्रतिनिधी
कोपरगाव प्रतिनिधी- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मालपाणी लॉन्स मध्ये अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन तसेच ब्रिहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे नुकतेच अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक योगा खेळाडू सहभागी झाले होते. त्यात कोपरगाव येथील योगपटू प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांनी देखील सहभाग नोंदवत योगाच्या पारंपारिक स्पर्धेत पहिला क्रमांक, एकल स्पर्धेत दुसरा क्रमांक तर तलात्मक जोडी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत दोन गोल्ड मेडल, एक सिल्वर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन करत संपूर्ण योगा स्पर्धेत जिल्ह्यातील “बेस्ट ऑफ द योग पटू” गौरव प्राप्त केला आहे.
जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत वैष्णवी आदिनाथ ढाकणे हिचा पाचवा नंबर आला आहे.
या स्पर्धेतिल सर्व यशस्वी खेळाडूंचा मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी, सचिव उमेश झोटिंग ट्रेझर कुलदीप कागदे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
असून प्रज्वलच्या या यशा बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर योग प्रशिक्षक प्रसाद घायवट यांचे देखील त्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. तसेच या स्पर्धेत प्रज्वल योगा हेल्थ केअर सेन्टर चे सदस्य चित्रकार हेमंत वाणी यांनी देखील सिनियर वयोगटात पारंपरिक योग स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य