Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थान च्या दर्शन रांगेतील सीसीटीव्हीमुळे विसरलेली पर्स परत मिळाली. 

0 0 8 3 2 2

श्री साईबाबा संस्थान च्या दर्शन रांगेतील सीसीटीव्हीमुळे विसरलेली पर्स परत मिळाली.

शिर्डी :- प्रतिनिधी 

दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ०२:३० वा. महिला साईभक्त सौ. ई.के. सुजाता, रा. मैसूर, कर्नाटका यांची लेडीज पर्स‌‌‌ ज्यामध्ये रोख रक्कम रु.६६५०/- होती, ती पर्स त्या नवीन दर्शन रांग रक्तदान शिबीर डेस्कवर विसरल्या. त्यानंतर ती पर्स दर्शनासाठी जात असण्याऱ्या दुस-या महिला साईभक्त सौ. सेयशु कुमारी, जि. कृष्णा, आंध्रप्रदेश यांनी नजर चुकीने उचलून घेतली. सौ. सुजाता, यांनी पर्स विसरल्या बाबतची तक्रार नवीन दर्शन रांग चे सुरक्षा अधिकारी श्री रमेश चव्हाण यांचेकडे केली असता, नवीन दर्शन रांग मधील CCTV फुटेज तपासून , साईभक्त, सेयशु कुमारी यांना समाधी मंदिरात जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना विचारणा केली असता त्यांनी पर्स सापडल्याचे कबूल केले.

त्यानंतर, दोन्ही महिला साईभक्तांना संरक्षण कार्यालयात नेऊन सदर पर्स व रोख रक्कम रु.६६५०/- रु साईभक्त सौ. सुजाता यांच्या स्वाधीन करण्यात आली. सुरक्षा अधिकारी श्री रमेश चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे साईभक्तांची पर्स/ पैसे परत मिळाले.

श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे मुख्य सुरक्षा रक्षक अधिकारी पीएसआय रोहिदास माळी यांनी श्री रमेश चव्हाण यांचा सन्मान केला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 3 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे