Breaking
ब्रेकिंग

गोदावरी पुनर्जीवन अवमान याचिका अपडेट्स मा उच्च न्यायालयाने पोलीस कमिशनर यांना 18 डिसेंबर पर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले

0 1 0 3 3 0

गोदावरी पुनर्जीवन अवमान याचिका अपडेट्स

मा उच्च न्यायालयाने पोलीस कमिशनर यांना 18 डिसेंबर पर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले

राजेश पंडित विरुद्ध मनीषा खत्री + लिंबाजी भड MPCB+ पाटील MIDC + कलेक्टर आयुष्य प्रसाद + संदीप कर्णिक
या अवमान याचिकेची सुनावणी आज मा मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली.

राजेश पंडित यांच्या वतीने बाजू मांडतांना adv निखिल पुजारी यांनी सांगितले की मा उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले आहेत परंतु सर्व प्रतिवादी केवळ कागदावरच आदेशांचे पालन करू म्हणतात. प्रत्येक्षात जमिनीवर काम होत नाही. आजही गोदावरी व तिच्या सर्व उपनद्या प्रदूषितच आहेत. कुंभ मेळा येऊ घातला आहे त्यामुळे करोडो लोकांच्या स्वास्थ्याची चिंता आहे. पिंपळगांव खांब आणि गंगापूर येथील नवीन STP बांधण्याव्यतिरिक्त नाशिक मनपाने, mpcb ने, midc ने आणि पोलीस आयुक्त यांनी झालेल्या कुठल्याही आदेशांची अंमलबजावणी केलेली नाही.
अनेक आदेश दिले आहेत ज्याचा एक चार्ट दिला आहे.
आत्तापर्यंत पोलीस आयुक्तांना सोडून सर्वांनाच नोटीस दिल्या गेल्या होत्या. सर्वांनी त्यांचे म्हणणे दिले आहे. आज मा उच्च न्यायालय यांनी पोलीस आयुक्त यांना सुद्धा त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले
त्यांना आदेश आहेत की गोदावरी च्या संरक्षणासाठी 4 PSI आणि 30 पोलीस असे कायम स्वरूपी पथक द्यायचे आहेत. मनपाने देखील या आदेशानुसार पोलीस आयुक्तांकडे तशी मागणी केली होती.
आज असलेल्या STP यांचे नूतनीकरण बाबत, CETP, बाबत, MPCB कुठलीच कार्यवाही करीत नसल्या बाबत असे अनेक मुद्दे याचिककर्त्यांच्या वकिलाने मांडले.

सर्वांचे म्हणणे ऐकण्यासाठी 18 डिसें 2025 तारीख ठेवण्यात आली.
बाकी सर्व प्रतिवादींनी आपापले अकॅशन प्लॅन जमा केले आहेत परंतु
अंतिम निकाल 18 डिसें 2018 ला दिला होता. 8 वर्ष अंमलबजावणी झाली नाही ती 1 वर्षात होईल यावर विश्वास बसत नाहीये.
सुनावणी मा जस्टीस रेवती मोहिते डेरे आणि मा श्री जस्टीस संदेश दादासाहेब पाटील यांच्या खंडपीठ समोर चालू होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे