उदगीर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनापासून वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात”
“उदगीर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनापासून वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात”
उदगीर :- प्रतिनिधी
बुधवार दिनांक ०५ जून २०२४ पासून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाने यावर्षी लातूर जिल्हाभर माहे जून ते ऑगस्ट दरम्यान वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येत आहे. उदगीर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी सुंदर बोंदर प्रशासक सुशांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उदगीर नगरपरिषद कार्यक्षेत्रांतर्गत खुल्या जागा, मैदान, उद्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्धार आहे.
याची सुरुवात आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंदनगर पाण्याची टाकी परिसरामध्ये मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिक यांच्या शुभहस्ते विविध फळझाडे व सावली देणारे वृक्ष लावून करण्यात आली.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने उदगीर शहरातील नागरिक, व्यापारी, समाजसेवी संस्था, गणेश मंडळ, मित्रमंडळ यांना जाहीर आवाहन करण्यात येते आहे की, आपण आपले घर अंगण, परिसर, परसबाग, खुली जागा इत्यादी ठिकाणी प्रती कुटुंब एक झाड याप्रमाणे वृक्ष लागवड चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. त्याचप्रमाणे पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवावे या हेतूने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावरील पाणी जमिनीच्या गर्भात मुरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सतिश बिलापट्टे यांच्या सह वृक्षविभाग, स्वच्छता विभाग, एनयुएलएम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!