शुक्राचार्य महाराज मंदिर गाभाऱ्याच्या नूतनीकरणास प्रारंभ
शुक्राचार्य महाराज मंदिर गाभाऱ्याच्या नूतनीकरणास प्रारंभ
कोपरगाव – प्रतिनिधी
सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात महाराजांचा गाभारा याचे नूतनीकरण , सुशोभीकरण करण्यात येणार आहे . त्याच बरोबर महाराजांची मकरणा मार्बल ची आकर्षक मुर्ती बनऊन तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे .
सदर कामासाठीचा सर्व खर्च कॅप्टन सुरेश आव्हाड यांचे नाशिक येथील मित्र तसेच दानशूर भक्त श्री प्रदीप सेठ राठी हे करणार आहे .
या संदर्भात माहिती देण्यासाठी आज श्री कोपरगाव बेट देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी देवस्थानचे सर्व ट्रस्टी तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांची मीटिंग बोलवून सर्व कामाचे रूपरेषा कशी असेल कशा पद्धतीने काम होणार आहे आणि महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करावयाचे आहे या संदर्भात मीटिंगमध्ये माहिती दिली आज पासून कामाचा श्री गणेश होणार आहे हेही त्यांनी सांगितले
हे काम सुरू असताना कालावधी लागणार आहे या कालावधीमध्ये मंदिरात येणाऱ्या भक्तांची थोड्याफार प्रमाणावर का होईना गैरसोय होणार आहे त्याबद्दल मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली या कामाच्या प्रारंभा अगोदर पूजा करण्यात आली या पूजेसाठी ट्रस्टी श्री व सौ एस एल कुलकर्णी तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री व सौ दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड श्री हेमंतजी पटवर्धन मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपमंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे श्री मधुकर साखरे श्री विलास नाना आव्हाड श्री विजयराव रोहम श्री आदिनाथ ढाकणे श्री बाळासाहेब गाडे श्री दिलीपराव सांगळे श्री राजेंद्र आव्हाड श्री सुजित वरखडे श्री भागचंद दादा रुईकर श्री महेंद्र नाईकवाडे श्री संजय वडांगळे मंदिराचे व्यवस्थापक श्री राजाराम पावरा मंदिराचे पुजारी श्री जोशी गुरु श्री भनगे गुरु हे उपस्थित होते