अमेरिकेत नोकरी व वास्तव्यास असलेल्या तरुणाचे कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न

अमेरिकेत नोकरी व वास्तव्यास असलेल्या तरुणाचे कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न
कोपरगाव :- प्रतिनिधी
अमेरिकेत नोकरी व वास्तव्यास असलेल्या तरुणाचे कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात विवाह मोठ्या थाटामाटा संपन्न.
कोपरगाव शहरातील बेट भाग या ठिकाणी गुरु शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये विवाहाला कुठलाही मुहूर्त लागत नाही, तेथे कधीही विवाह करू शकतात असं या मंदिराचे विशेष महत्त्व आहे नुकतेच अमेरिकेत नोकरीस असलेल्या व अमेरिकेतच वास्तव्यास असलेल्या समर्थ चंद्रवर्धन पटेल बडोदा गुजरात हल्ली मुक्काम अमेरिका या तरुणाचा ९ जानेवारी 2025 रोजी विवाह संपन्न झाला आहे या तरुणाचा विवाह भूमिका जयवंत नारखेडे जळगाव महाराष्ट्र असं या तरुणीचं नाव आहे या दोन्ही उच्चशिक्षित तरुण तरुणीचा विवाह कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये संपन्न झाला आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिष्याचार्य संजय चव्हाण संभाजीनगर यांचे ते भाचे आहेत या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते देशातील विविध राज्यातील नातेवाईक मित्र आधी उपस्थित होते त्याचबरोबर गुरु शुक्राचार्य मंदिराच्या वतीने ट्रस्टी पटवर्धन मंदिर समिती प्रमुख सचिन परदेशी, मंदिर समिती उपप्रमुख प्रसाद पर्हे आदिनाथ ढाकणे रवि पठाडे यांनी या विवाहास उपस्थित राहून शुभ मनोकामना व्यक्त केल्या आहेत.