“ शून्यातून उभा राहिलेला आरोग्यधाम प्रसादजींच्या कर्तृत्वाची* *सुवर्णगाथा* !”

“ शून्यातून उभा राहिलेला आरोग्यधाम प्रसादजींच्या कर्तृत्वाची* *सुवर्णगाथा* !”
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 प्रसाद जी
कोपरगावच्या मातीतून उगवलेला हा तेजस्वी दीप…
जिथे शहरांची स्वप्नेही कधी संकोचतात,
तिथे तुम्ही मात्र स्वप्नांना पंख दिले
आणि उभारली एक “ आरोग्याची पंढरी ”
*यशाचा गौरव* साजरा करताना
डोळ्यांसमोर चमकते ते फक्त शिखर…
पण त्या शिखरामागे असते
तपस्येची तणमशागत, घामाची शिदोरी,
आणि असंख्य संघर्षांचे निःशब्द अध्याय…
अल्पावधीत मिळवलेले हे यश
केवळ कौतुकास्पद नाही,
तर प्रेरणादायी आहे
कारण ते घडले आहे
कठीण परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती
आणि “स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठी काहीतरी”
या ध्यासातून…
कॅन्सर सारख्या गंभीर आजारासाठी
जिथे सामान्य माणसाला शहरांकडे धाव घ्यावी लागते,
तिथे तुम्ही उभं केलं एक आश्वासक दालन
जिथे उपचार नाही, तर विश्वास मिळतो…
जिथे सेवा नाही, तर संवेदना जिवंत राहतात…
कोपरगाव सारख्या ग्रामीण भूमीत
*एमबीबीएस* सारखा अभ्यासक्रम सुरू करणं
हे केवळ स्वप्न नव्हे,
तर धाडस, *दूरदृष्टी* आणि *समाजधर्म* यांचा संगम आहे…
तुमचं हे कार्य म्हणजे
जणू आरोग्याच्या वाळवंटात उमललेलं “ *आशेचं नंदनवन* ”
When Breath Becomes Air या पुस्तकातील
*Paul Kalanithi*
म्हणतात
“The goal is not to avoid death, but to live meaningfully.”
आणि हाच अर्थ तुम्ही आपल्या कार्यातून जिवंत केला आहे
जीवनाला अर्थ देणं,
हेच खऱ्या अर्थाने *वैद्यकीय सेवेतलं* श्रेष्ठ कार्य आहे…
*RJS फाउंडेशनच्या* माध्यमातून
तुम्ही उभारत असलेली ही “ *आरोग्य पंढरी* ”
उद्याच्या पिढ्यांसाठी *दीपस्तंभ* ठरेल
जिथे प्रत्येक रुग्णाला
फक्त उपचार नाही, तर *नवजीवनाची* आशा मिळेल…
*प्रसादजी* ,
तुम्ही फक्त एक *उद्योजक* नाही,
तर एका नव्या *युगाचे शिल्पकार* आहात…
ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं,
आणि त्या *विश्वात माणुसकीला* केंद्रस्थानी ठेवलं…
तुमच्या या *अद्वितीय* कार्याला
मनःपूर्वक सलाम…
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*
तुमचं आयुष्य असंच उज्ज्वल राहो,
आणि तुमच्या कार्यातून
असंख्य जीवांना *नवसंजीवनी* मिळत राहो… सदैव अभिमान, व माझा विधार्थी म्हणून कौतुक..
गोरे सर
🌹🙏🍫🤝🙏




