76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त के. जे. सोमय्या महाविद्यालयातील ध्वजारोहण जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांच्या हस्ते संपन्न

के जे सोमय्या वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्यने मुंदडा यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या हातून ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सत्येन मुंदाडा यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करून देशाचे व आपल्या कॉलेजचे नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन केले.
ध्वजाला के .जे .सोमय्या कॉलेजच्या एन सी सी कॅडेट ने परेड करून ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर महाविद्यालयातील प्रज्वल ढाकणे आणि वैष्णवी ढाकणे या विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे मन जिंकले
प्राचार्य विजय ठाणगे सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले आणि कॉलेजच्या स्थापनेपासून आतापर्यंत कॉलेजने केलेली प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सत्येन मुंदडा यांच्या हाताने सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी के .जे. सोमय्या कॉलेजचे मॅनेजिंग ट्रस्टी संदीप रोहमारे प्राचार्य विजय ठाणगे उपप्राचार्य सोनवणे सर एनसीसी चे शिंदे सर श्रीमती आहेर मॅडम सुनील कुटे सर एन एस एस चे कॉर्डिनेटर डॉक्टर बी एस गायकवाड सर जिजाबा मोरे सर दवंगे सर रवींद्र जाधव सर आरगडे सर वसुदेव साळुंखे सर ऑफिस प्रमुख जितेंद्र नाईकवाडे सर सर्व प्राध्यापक ऑफिस कर्मचारी वॄद व विद्यार्थी उपस्थित होते.