के. जे. सोमैया महाविद्यालयात ̒बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिटरी सर्विसेस ̕ विषयावर कार्यशाळा

के. जे. सोमैया महाविद्यालयात ̒बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिटरी सर्विसेस ̕ विषयावर कार्यशाळा
के. जे. सोमैया महाविद्यालयात ̒बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिटरी सर्विसेस ̕ विषयावर कार्यशाळा
कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय, कोपरगाव येथे वाणिज्य विभाग व सी.डी.एस.एल. व सेबी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिटरी सर्विसेस या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सी.डी.एस.एल. संस्थेच्या मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट अश्विनी थोरात- खेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सेबी च्या अवेअरनेस कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. रवी आहुजा हेही उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. संतोष पगारे यांनी मान्यवरांचे स्वागत करतांनाच या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला. तसेच सेबीचे इन्वेस्टर अवेअरनेस प्रोग्राम हे वाणिज्य च्या विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केटमध्ये सुशिक्षित करण्याचा प्लॅटफॉर्म असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अश्विनी थोरात-खेडकर यांनी से.बी. व सी.डी.एस.एल. संस्थेची कार्यप्रणाली समजावून सांगतानाच भाग बाजारात गुंतवणूक करतांना अभ्यासपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करावी. भाग बाजार हा सट्टा नसुन या बाजारात गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, विविध पोर्टल यावर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने कु. मेघा सोनवणे हीने विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली.
या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रो. संजय अरगडे यांनी केले. प्रा. विजय सोमासे, प्रा. अजित धनवटे, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर यांनी कार्यशाळेसाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी वाणिज्य विभागाचे अभिनंदन केले.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य