माजी आमदार श्री पंकज छगनराव भुजबळ गुरु शुक्राचार्य महाराज चरणी
माजी आमदार श्री पंकज छगनराव भुजबळ गुरु शुक्राचार्य महाराज चरणी
कोपरगाव :- प्रतिनिधी
जगातील एकमेव समजले जाणारे गुरु शुक्राचार्य महाराजांचे मंदिर जेथे कोणत्याही शुभकार्यास मुहूर्त बघावा लागत नाही अशा पवित्र व पावन मंदिरामध्ये आज श्री पंकज छगनराव भुजबळ यांनी मंदिराला भेट दिली मंदिरात आल्यानंतर मंदिर अती भव्य असल्याचे जाणवते तसेच मंदिरात लाभणारी शांतता व प्रसन्नता या गोष्टीचे प्रकर्षाने व प्रामुख्याने त्यांनी अनुभूती घेतली मंदिराचा इतिहास जाणून घेतला मंदिर अतिसुंदर विशाल असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिराचे मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी मंदिर प्रमुख सचिन परदेशी मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे ओमकार आव्हाड मंदिराचे व्यवस्थापक राजारामजी पावरा मंदिराचे पुजारी जोशी गुरु व भणगे गुरु हे उपस्थित होते.
!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!