कवटाचे झाडं नामशेष होत चालले का……..???
कवटाचे झाडं नामशेष होत चालले का……..???
कोपरगाव :- प्रतिनिधी
आज सकाळी उठायला जरा उशीर झाला आठ वाजले दररोज कॉलेजवर जात असतो फिरायला पण आज घराच्या जवळ असलेलेल्या शेताच्या दिशेने पाऊल वाटेने पुढे निघालो म्हणजे रस्ता केलेला आहे जसं जसं पुढे जात होतो तसं तसे एक एक शेतकरी बांधवांची वस्ती लागत होते प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये आंबा, नारळ , चिकू , लिंबू, पेरू, पपई असे अनेक झाड दिसत होते पण हळूहळू पुढे जात असताना अचानक एका वस्तीच्या समोर मला कवठाचे झाड दिसले झाड बघून मी त्याच्याजवळ जाऊन थबकलो आणि त्याच्याकडे बघत उभा राहिलो त्या कवठाच्या झाडाला खूप कवठे लटकलेले होते ते बघून मनामध्ये एक विचार आला हे कवठाचं झाड तर सध्या नामशेष पावत चाललाय.मी अनेक लोकांना विचारलं असतं बऱ्याच लोकांनी मला कवठाचं झाड का लावत नाही याचे कारण सांगितले कवठाचे झाड लावले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कवठे येतात त्यामुळे त्या झाडाखाली उभे राहिले आणि डोक्याला इजा झाली तर किंवा झाडा खाली गाडी लावली तर काच फुटू शकते आणि नुकसान होऊ शकते म्हणून कवठाचे झाडं शक्यतो लावण्याचे टाळतात कोणाला लागेल किंवा त्याच्या त्या झाडाखाली ही गाडी असेल तर गाडीची काच फुटेल गाडीचं नुकसान होऊ शकते असे एक एक सूर ऐकायला मिळाला पण मी जे हे सकाळी कवठाच झाड बघितलं हे शेतामध्ये मस्तपणे कवठाणे बहरलेलं होतं मग काय मला खूप आनंद झाला आणि थोडंसं लिहावं असं वाटलं म्हणून हे आज तुमच्या सर्वांना माहितीसाठी लिहीत आहे खरं तर कवठे फळ महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर वाहिले जातात वाहून झाल्यानंतर महाशिवरात्रीला आपण कवट या फळाचं सेवन करतो.
कवट या फळांमध्ये क जीवनसत्व आढळते ज्यांना भूक लागत नाही त्यांनी जर कवठ खाल्ले तर त्यांना चांगल्या प्रमाणात भूक लागते ज्यांना कुणाला जुलाब होत असेल त्यांनी कवठ खाल्ले तर त्यांचे जुलाब पण बंद होतात ज्यांना मळमळ उलटी असे होत असेल त्यांनी जरी कवठ खाल्ले तरी त्यांना खूप फायदा होतात* महाशिवरात्रीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होते. उन्हाळ्यामध्ये मळमळ होणे उलटी होणे जुलाब होणे भूक न लागणे असे प्रकार होतात म्हणून उन्हाळ्यामध्ये कवट या फळाचे सेवन करावे. म्हणून महाशिवरात्रीपासून पुढे तुम्ही उन्हाळाभर कवट खाऊन निरोगी राहावं हा त्यामागील एक संदेश आहे किंवा भोले शंकरांचा तुम्हाला आदेश आहे असं म्हटलं तरी चालेल.
मी काही लोकांना विचारलं कवठ कधी खाल्ले तर त्यांनी सांगितलं मागच्या शिवरात्रीला खाल्लं होतं काही लोकांना तर आठवत पण नाही कधी खाल्लं होतं म्हणजे बघा आपण निसर्गापासून किती लांब चाललेला आहोत आपण सध्या आपली लाईफस्टाईल बदलून घेतलेली आहे आपल्याला पिझ्झा बर्गर पाववडा ,बटाटा वडा ,भजी, मंचुरियन ,चायनीज ,मॅगी , हॉटेलचे जेवण असे पदार्थ फार आवडायला लागलेले आहेत ज्याने आपल्या शरीराला खूप त्रास होतो आपली पचन संस्था बिघडते पण तरी आपण गोळ्या घेऊन या पदार्थांचा आस्वाद घेतो आणि निसर्गाने दिलेल्या आपल्या कवठाचा किंवा असे अनेक फळांचा आपण आस्वादच घेत नाहीत किंवा आपल्याला कवठाची टेस्ट कशी आहे हे सुद्धा माहिती नाही खरंतर हे आपलं दुर्दैव आहे कारण आपलं निसर्गाशी नातं तुटत चाललेला आहे आपल्या सर्वांना विनंती आहे किमान महिन्यातून एकदा एक चक्कर कुणाच्याही शेताच्या दिशेने मारा आणि आनंद घ्या मी तर आज आनंद घेतला आणि खूप सारे कवठे घेऊन घरी आलेलो आहे .घरी आल्यावर आईला सांगितलं मस्त कवठाचं आत मधील गर काढ आणि त्याच्यामध्ये गुळ घाल आणि आम्हाला तो सगळ्यांना खायला द्या आज सकाळी कवठाचं झाड बघून या सर्व गोष्टी मनात आल्या म्हणून ह्या लिहून काढल्या आणि आपल्यापुढे मांडलेले आहेत कुठेही मी आपल्या भावनांना ठेच न पोहोचतात हे लिहिलेलं आहे जर आपल्याला कुठेही कवठाचं झाड दिसलं तर ते झाड लावा कवठाचा आस्वाद घ्या आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा तो आस्वाद चाखायला सांगा कारण मी माझ्या मुलाला विचारलं मुलीला विचारलं अरे तुम्ही कवठ खाऊन किती दिवस झाले तर ते बोलले एक वर्ष झाले आहे. म्हणजे माझ्या घरची परिस्थिती ही फार वेगळी नाही आज त्यांना कवठाच्या फळाचा आनंद घ्यायला सांगितला आहे मी सुरुवात माझ्या घरापासून केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला सांगतोय पुन्हा नक्कीच कधीतरी असं काहीतरी लिहील नवीन एखादं झाड भेटल्यानंतर आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सांगेल .
*मी तर कवठाचं झाड लावणार आहे*
*ज्यांना कोणाला शेत असेल त्यांनी एक किमान कवठाचं झाड लावावं*
लेख आवडला तर शेअर करा
धन्यवाद……….!
आपलाच
आदिनाथ आसराबाई गोरखनाथ ढाकणे.
मो.नं.9423183470
बेट कोपरगाव जि आहिल्यानगर