अहिल्यानगर (अहमदनगर ) जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली चला जाणून या नदीच्या नदी प्रहरीची मिटिंग
चला जाणू या नदीला या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील सर्व नदी प्रहरी ची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी आणि उपवन संरक्षक अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
कोपरगाव :- प्रतिनिधी
बैठकीच्या प्रसंगी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री सालीमठ साहेब उप वनसंरक्षक अधिकारी श्रीमती सुवर्ण माने मॅडम जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. या मिटींगमध्ये सर्व नदीच्या पुनर्जीवना संदर्भातील कामांची चर्चा झाली आणि अहवाल मागवण्यात आले. त्याचबरोबर नदी संवाद यात्रेच्या अंदाजपत्रका वर चर्चा झाली आणि लवकरात लवकर अंदाजपत्रक सादर करण्यास सांगितले आहे.
यावेळी जलबिराद्ररी चे नरेंद्रजी चुग अगस्ती नदीचे नदीप्रहरी आदिनाथ ढाकणे मोती नदीचे नदीप्रहरी मनोज साठे आढळा व माळुंगी नदीचे नदीप्रहरी विठ्ठलजी शेवाळे सुभाषजी देशमुख आणि संपतजी देशमुख उपस्थित होते.
!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!