Breaking
ब्रेकिंग

नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप यांच्या वतीने उपसचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला

0 1 0 3 3 0

 

       ॥ हार्दिक अभिनंदन

कोपरगाव :- प्रतिनिधी 

 शहरातील सामाजिक संघटना नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने श्री.संदीप गोरखनाथजी ढाकणे यांची महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील उपसचिव पदी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात पदोन्नती झाली. त्याबद्दल माझ्या दुकाना समोरील कहार गल्ली येथे त्यांचा येथोचित सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले. कहार गल्लीतील श्री.धनंजय कहार व गणेश लकारे यांनी या सत्कारा करता बरेच परिश्रम घेतले.
वाल्याचा-वाल्मिकी झालेले श्री.आदिनाथजी ढाकणे हे माझे पूर्वीपासूनचे सहकारी गोदामाई प्रतिष्ठान हे त्यांचे काम उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांना अनेक पदे व मानसन्मान मिळाला आहे जलतज्ञ श्री.डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदामाई साफ-सफाई अभियान संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे.
श्री.संदीप ढाकणे हे आदिनाथ ढाकणे चे लहान भाऊ अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. कहार गल्लीत राहणारे श्री.राहुल कहार यांचे ते वर्गमित्र अगदी लहान असताना त्यांच्या घरी येणे जाणे होते. श्री.संदीप ढाकणे यांच्या घरची परिस्थिती हालक्याची असताना कहार कुटुंबियांनी त्यांना खूप जीव लावला. राहुल कहार यांची बहीण दरवर्षी राखी पौर्णिमेला संदीप ला राखी बांधायची काल योगायोगाने रक्षाबंधन सण होता. त्यामुळे त्यांच्या बहिणीने संदीप ढाकणेला राखी बांधून ओवाळले, 35 वर्षानंतर चा हा प्रसंग सर्वांचे मन हालवून गेला. चित्रपटाच्या कथेप्रमाणे सर्व प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले.
आज कोपरगावात संजीवनी अकॅडमी, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, समता इंटरनॅशनल, आत्मा मालिक स्कूल, जनार्दन स्वामी स्कूल, महानुभव यांचे लॉ कॉलेज व नर्सिंग कॉलेज यांच्या बसेस कोपरगाव दिवसभर विद्यार्थ्यांना घेण्यात येत असतात,त्यामुळे एक शैक्षणिक वातावरण शहरात तयार झाले आहे. आज संजीवनी पॉलिटेक्निकल कॉलेज यांना सलग बारा वर्ष मानांकन मिळाले आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव कॉलेज आहे. संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या वतीने हजारो मुलांना 25 ते 30 लाख वर्षाचे पॅकेज प्लेसमेंट द्वारे दिले जाते, हे कोपरगावकरांना आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
श्री.संदीप ढाकणे यांच्या बोलण्यातून आपल्या शहरात शैक्षणिक वातावरणात बऱ्याच त्रुटी आहे.
पूर्वी अकरावी,बी.ए ,बी.कॉम असे शिक्षण झाले म्हणजे शिक्षण झाले,असे समजत पण आता उच्च शिक्षण ही काळाची गरज झाली आहे.
बाजारतळ,कहार गल्ली,शिवाजी रोड येथे प्रचंड दाट लोकसंख्या आहे. पण दुर्दैवाने आज लहान-लहान विद्यार्थ्यांना येथे शैक्षणिक वातावरण मिळत नाही. हे कटू पण सत्य आहे. ज्यांना शक्य असेल पालकांनी आपल्या मुलांना घरामध्ये अभ्यासची योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी. कॉम्पुटर,लॅपटॉप आदींचे शिक्षण द्यावे. लहान मुलांना वाचनाची आवड लावावी. जो आज वाचन तोच पुढे शिकेल, आज सुदैवाने कोपरगाव नगरपालिका इमारतीत समताने स्टडी पॉईंट चालू केला आहे. महात्मा गांधी प्रदर्शन व स्व.सूर्यभानजी पाटील वहाडने घाट येथे सुद्धा विद्यार्थी अभ्यासाला येतात असे माझ्या पाहण्यात आले आहे.
इतर नेत्यांनी सुद्धा दोन-चार स्टडी पॉईंट शहरात चालू करावे. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण मिळावे याकरता आठ-दहा दिवसातून एक मार्गदर्शन शिबिर घ्यावे. लहान विद्यार्थ्यांना आतापासूनच पद,पैसा,भाई,नेता,ढोल-ताशे यापासून दूर ठेवावे.
यातूनच नवीन पिढी घडेल आणि असे श्री.संदीप ढाकणे सारखे दोन-चार यशस्वी विद्यार्थी तरी नवीन तयार होतील, या सत्काराच्या मागचा हा उद्देश थोडाया फार प्रमाणात यशस्वी होईल असे वाटते. यू.पी.एस.सी,एम.पी.एस.सी अशा अनेक स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केंद्र कोपरगावात सुरू व्हावे. म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करण्यास सोपे जाईल.
पुन्च्छ एकदा श्री.संदीप ढाकणे यांचे अभिनंदन ! व त्यांचे मार्गदर्शन शहराला नेहमी लाभावे अशी अपेक्षा.

नारायण शेठ अग्रवाल, कोपरगांव.
मो.9822630330

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे