Breaking
ब्रेकिंग

*…अखेर भरतवाडी परिसरातील आरओ प्लांट (शुद्ध पाण्याचा प्लांट) नागरिकांसाठी सुरू.*

0 1 0 3 3 0

 

*…अखेर भरतवाडी परिसरातील आरओ प्लांट (शुद्ध पाण्याचा प्लांट) नागरिकांसाठी सुरू.*

*वारी गावातील भरतवाडी परिसरातील आरओ प्लांटची निर्मिती करून आठ महिने उलटूनही तो नागरिकांसाठी सुरू करण्यात आला नव्हता. यावर दहा दिवसात प्लांट सुरू करावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात प्रभाग क्रमांक 04 चे ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके, योगेश झाल्टे व प्रणाली देशमुख यांच्या वतीने मंगळवार दि.1 जुलै रोजी ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बुधवार दि. 2 जुलैपासूनच नागरिकांसाठी आरो प्लांट सुरू केला आहे.*


*या प्लांटची पाहणी करण्यासाठी आज अधिकृतरीत्या वारी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी मा. संग्राम बोर्डे यांनी बोलावले असता पाहणी दरम्यान प्रत्यक्षात स्थानिक नागरिकांना यावेळी शुद्ध पाण्याचा लाभ देण्यात आला. आरओ प्लांट सुरू करण्यात आला. या संदर्भातील लेखी स्वरूपात आजच पत्राद्वारे कळवले आहे. तसे पत्रही ग्रामपंचायत अधिकारी संग्राम बोर्ड यांनी ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके व माझे ग्रामपंचायत सदस्य योगेश झाल्टे यांना प्रत्यक्षात दिले आहे.*
*या सर्व प्रकारात आमचे कुटुंबप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष आदरणीय राजेशजी आबा परजणे पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो. तसेच दिलेल्या निवेदनातून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद…*

*या पुढील काळातही नागरिकांच्या सोयीसाठी, न्याय हक्कासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने लढा सुरू राहील…*

*यावेळी आमचे मार्गदर्शक नरेंद्र काकाजी ललवाणी, आमचे चुलते राजेंद्र टेके, अध्यक्ष जगन्नाथ मैराळ, ग्रामपंचायत अधिकारी संग्राम बोर्डे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, स्थानिक महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.*

*आपलाच पत्रकार मित्र रोहित म. टेके पाटील.*
*सदस्य, ग्रामपंचायत वारी, ता. कोपरगाव जि.अहिल्यानगर*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे