Breaking
ब्रेकिंग

2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांनी गोदावरी नदीच्या पाण्यात आंघोळ करणे योग्य आहे का…?

0 0 4 7 8 9

दिनांक 06/12/2024
प्रति
मा विभागीय आयुक्त (महसूल)
(अध्यक्ष, उच्च न्यायालय गठीत समिती, जनहित याचिका क्र 176/2012)
नाशिक

विषय :- सिंहस्थ कुंभ मेळा, भाविकांचे स्नान

मा महोदय
आपणास माहीत आहेच की मा उच्च न्यायालयाने गोदावरी नदीचे पाणी हे मानवी वापरास अयोग्य आणि स्वास्थ्यास हानिकारक घोषित केले आहे ( *Unfit for human consumption and dangerous to health).*
आमच्या माहिती नुसार हजारो कोटी रुपयांचा निधी सिंहस्थ कुंभ मेळा साठी येणार आहे ज्यामध्ये विविध विकास कामे प्रस्तावित आहेत. गत कुंभमेळा दरम्यान मा उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला आदेशीत करून निधी द्यायला लावले होते त्यापाठीमागे गोदावरी अविरल, निर्मल होईल असे अपेक्षित होते परंतु वस्तुतः तसे झाले नाही.

करोडो भाविकांच्या आरोग्या शी तसेच गोदावरी नदीच्या आरोग्याशी हा विषय निगडित असल्याने ह्या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

मा उच्च न्यायालयात मागील कुंभ मेळ्यात मी PIL/176/2012 मध्ये एक अर्ज (Rajesh Pandit and others Vs NMC and others असा Civil Application ST no 13231/2017) दाखल केला होता की कुंभ मेळ्या दरम्यान स्नानास बंदी घालावी. तो अर्ज मा उच्च न्यायालयाने *विविध आदेश देऊन* निकाली काढला होता परंतु आज तागायत मा न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन झालेले नाही.

या पार्श्वभूमी वर आपणास नम्र विनंती आहे की संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना आपण निर्देश द्यावेत की कुंभ मेळा पुर्वी गोदावरी नदीचे पाणी मानवी वापरास, पिण्यास, स्नानास योग्य होईल असे नियोजन करावे तथा गोदावरी नदीचे जल हे मानवी वापरास योग्य झाले आहे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घ्यावे व तसे मा उच्च न्यायालयास अवगत करावे.
आपण सर्व संबंधित यंत्रणांना मा उच्च न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन कुंभमेळ्यापूर्वी होण्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा द्यावी आणि त्या कालमर्यादेत गोदावरी नदीचे जल हे मानवी वापरास योग्य करण्यास सांगावे अन्यथा कुंभ मेळ्यामध्ये स्नानास बंदी घालावी अशी शिफारस आपण आपल्या समिती तर्फे, उच्च न्यायालयात सादर केल्या जाणाऱ्या अहवालात करावी ही विनंती.

राजेश पंडित
(याचिककर्ता PIL/176/2012)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे