पौराणिक गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात सापडले ध्यान मंदिर
पौराणिक गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात सापडले ध्यान मंदिर
कोपरगाव :- शहर प्रतिनिधी
कोपरगावचे ग्रामदैवत, संजीवनी मंत्राचे उगमस्थान, अतिशय पौराणिक, प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानमंदिर आढळून आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी, हेमंत पटवर्धन कॅप्टन सुरेश आव्हाड तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य बाळासाहेब लाकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजय रोहम, आदिनाथ ढाकणे, भागचंद रुईकर विलास आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत, संजय वडांगळे व्यवस्थापक राजाराम पावरा आदि मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी आव्हाड यांनी पुढे बोलताना सांगितले की, येणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याच पार्श्वभूमीवर मंदिराचे नाशिक येथील उद्योगपतींच्या मदतीने सहकार्याने सुशभकरणाचे काम सुरू असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली जागा म्हणजे पुरातन अशी खिडकी दिसून आली असता सर्वांच्या सहमतीने विचाराने ती खिडकी खोलत तेथील माती मोकळी केली असता सभा मंडपाच्या गच्चीच्या खाली १२ बाय १२ या जागेमध्ये ६ फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली असता त्यातील सर्व माती बाहेर काढत ती जागा पूर्णपणे स्वच्छ केली असून त्या संपूर्ण जागेत माणूस आरामात ध्यानाला बसू शकतो इतकी मोठी ती जागा आहे. विशेष म्हणजे ती जागा अत्यंत शीतल असून गारवा त्या ठिकाणी जाणवत आहे. सदरच्या जागे विषयी पूर्ण माहिती अथवा पुरावे आम्हाला कोणाला सापडले नसल्याने आम्ही त्या जागेस सर्वानुमते ध्यान मंदिर असे संबोधले असल्याची माहिती आव्हाड यांनी याप्रसंगी दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य आदिनाथ ढाकणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंदिर प्रमुख सचिन परदेशी यांनी व्यक्त केले.