कोपरगाव सिंधी समाज गणेशोत्सव मंडळाने देशी 500 झाडे वाटून केले गणपती बाप्पाचे विसर्जन वर्ष 52 वे.
कोपरगाव सिंधी समाज गणेशोत्सव मंडळाने देशी 500 झाडे वाटून केले गणपती बाप्पाचे विसर्जन वर्ष 52 वे.
कोपरगाव :- प्रतिनिधी
देशात होणारी वृक्षतोड-त्यामुळे होणारा पर्यावरणचा ऱ्हास- निसर्गाचा असमतोलपणा या सर्व बाबींचा विचार करता सिंधी समाज गणेशोत्सव मंडळाने *झाडे लावा-पर्यावरण वाचवा* हा देखावा सादर केला.
त्या अंतर्गत यावेळी या मंडळाने कोपरगाव शहरात एकूण 240 झाडे वाटण्यात आली. यात वड, पिंपळ,कडुनिंब, चिंच, आपटे, यासारखे अनेक देशी झाडे वाटण्यात आली.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष, निसर्गप्रेमी ब्रँड अँबेसिडर कोपरगाव नगरपरिषद मा.आदिनाथजी ढाकणे, के.जे सोमैया एन.एस.एस.प्रमुख बी.एस.गायकवाड सर, शैलेश बनसोडे सर यांना आणि NSS च्या विद्यार्थ्यांना देखील झाडे भेट देऊन पर्यावरण जपण्याचा मोलाचा संदेश दिला आहे.
यावेळी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे बी एस गायकवाड सर आणि शैलेश बनसोडे सर यांनी सिंधी समाज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.