श्री साईबाबा संस्थान च्या सफाई कर्मचारी संदीप गायकवाडचा प्रामाणिकपणा आला समोर
श्री साईबाबा संस्थान च्या सफाई कर्मचारी संदीप गायकवाडचा प्रामाणिकपणा आला समोर
शिर्डी :- प्रतिनिधी
आज रोजी साई आश्रम नं ०१ या ठिकाणी कॉउंटर जवळ एक अँपल कंपनीचा मोबाईल साईबाबा संस्थान चे सफाई कर्मचारी श्री संदीप गायकवाड यांना सापडला. त्यांनी सदर बाबत तेथील सुरक्षा सुपरवायझर यांना माहिती दिली. तो मोबाईल साईभक्त एन. नवीन कुमार यांचा असल्याचे समजले. त्यांचा संपर्क झाल्यावर ते मोबाइल घ्यायला आले तेव्हा त्यांनी सांगितले कि, नमूद मोबाईल ची किंमत 86,000/- रु आहे. एवढा महाग मोबाईल हरवला म्हणून मला खूप दुःख झाले, परंतु साईबाबांच्या कृपेने मोबाईल परत मिळाला. म्हणून त्यांनी संस्थान चे सफाई कर्मचारी श्री गायकवाड यांचे मनस्वी आभार मानले.सफाई कर्मचारी श्री गायकवाड यांचा सत्कार करून त्यांचे प्रामाणिकपणाबाबत अभिनंदन केले.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य संरक्षणाधिकारी पीएसआय रोहिदास माळी यांनी त्यांचा सत्कार केला