शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांनी साईभक्त चे महत्वाचे कागदपत्रे आणि पैसे तात्काळ संरक्षण ऑफिस मध्ये आणून दिले.
शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांनी साईभक्त चे महत्वाचे कागदपत्रे आणि पैसे तात्काळ संरक्षण ऑफिस मध्ये आणून दिले.
शिर्डी :- प्रतिनिधी
दिनांक 02/09/2024 रोजी साईबाबा मंदिर गेट नं 1 येथे शिर्डी चे मा. नगरसेवक श्री. सुरेश काळू आरने यांना एक लेडीज पर्स मिळाली. त्या पर्स मध्ये काही कागदपत्र, कार्ड्स आणि 5446/- रु रोख रक्कम होती. त्यांनी ती पर्स प्रामाणिकपणे तात्काळ संरक्षण ऑफिस ला जमा केली. सदर पर्स हि साईभक्त श्रीमती लता गौड, रा. हैदराबाद यांची असल्याचे समजले. त्यांना संपर्क करून, ओळख पटवून पैसे आणि पर्स परत केली. त्यावेळी त्यांनी मा. नगरसेवक श्री. सुरेश आरने, तसेच शिर्डी ग्रामस्थ यांचे आभार मानले. गावकरी देखील साईभक्तांची किती काळजी घेतात हे बघून साईभक्त आनंद व्यक्त करतात. श्री आरने यांची सचोटीबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री तुकाराम हुलवले यांनी अभिनंदन केले. त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थान चे मुख्य संरक्षण अधिकारी पी. एस.आय. श्री रोहिदास माळी सरांनी यथोचित सत्कार केला.