सहकारातून सभासदांची सेवा हे पुण्यकर्म – महंत मधुसूदनगिरीजी महाराज
सहकारातून सभासदांची सेवा हे पुण्यकर्म – महंत मधुसूदनगिरीजी महाराज
-भोजडे येथे वार्षिक सभेत आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न –
कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे येथील भोजडे नं २ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, भोजडे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच सरला बेटाशी निगडित पिंपळवाडी येथील श्री सोमेश्वर महाराज संस्थानचे ह.भ.प. मधुसूदनगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामायणाचार्य ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतीशील व्यावसायिक श्री.संतोष ज्ञानेश्वर सिनगर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी मा.अशोक लोहकरे साहेब उपस्थित होते. यावेळी महंत मधुसूदनगिरीजी महाराज यांनी सहकारातून सभासदांची सेवा हे उच्चतम पुण्यकर्म असून संस्थेची धुरा योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचे गौरोदगार काढले.
सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून कै.सिताराम व्यंकटराव पा. सिनगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी एक आदर्श सभासद म्हणून पुरस्कार देण्यात येत असतो. हे पुरस्काराचे तेरावे वर्ष असून यावर्षीचा आदर्श सभासद पुरस्कार ह.भ.प. मधुसूदनगिरीजी महाराज आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्री. सुधाकर अंबादास पा.सिनगर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचेक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 1111 मात्र देण्यात आली. यावेळी नेहमीप्रमाणे भोजडे गावाने खेळीमेळीत वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करत सहकार क्षेत्रात आपला एकोपा दर्शवीला.
यावेळी ह.भ.प.मधुसूदनगिरीजी महाराज यांनी संस्थेच्या संचालक मंडळास भरभरून आशीर्वाद देत आपल्या हातून समाजसेवेच्या माध्यमातून खरी ईश्वरसेवा घडत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात चेअरमन मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जाचक अटी आणि सरकारचा सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळे संस्था अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून काळाप्रमाणे यातील बदल स्वीकारले पाहिजे. जिल्ह्य बँकेने सर्व सोसायटी काम्पुट्राईज करून सचिवांना बँकेच्या सेवेत सामावून घेतले तर सर्व संस्था भक्कम होतील. आपण ज्या मातीत जन्माला आलो आणि ज्या पंचक्रोशीने आपल्याला उत्तम संस्कार दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थापक चेअरमन कै. सिताराम सिनगर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामुळे गेल्या तेरा वर्षापासून दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. यावेळी भोजडे जन्मभूमी आणि पुणे कर्मभूमी असणारे संतोष ज्ञानेश्वर सिनगर, शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर राहाणे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, संभाजीनगर येथील अनिल सुरडकर, जेष्ठ मार्गदर्शक शहाराम सिनगर, ज्ञानेश्वर महाराज नरोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी प्रमुख अतिथीमध्ये नानासाहेब दादा पा. सिनगर, संभाजी तात्या पा. सिनगर, रंगनाथ नाना पा. सिनगर, भाऊसाहेब पा. सिनगर, सरपंच सुधाकर वादे, साहेबराव रंगनाथ पा. सिनगर, अनंत जयराम पा. सिनगर, अशोक आप्पा काजळे, गणपत अण्णा गोंदकर, शंकर बबरू पा. सिनगर, विजय रंगनाथ पा. सिनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन चेअरमन मुकुंद सिनगर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शंकर सिनगर यांनी मानले. यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन दिनकर बाबासाहेब सिनगर समवेत संचालक रावसाहेब सिनगर , ज्ञानेश्वर सिनगर ,रामनाथ चंदणे, फकीरचंद जेऊघाले, दीपक धट, अशोक मंचरे, कुंडलिक घुले, विजय सिनगर, बळीराम सिनगर, राजेंद्र घनघाव, भीमजी शिंदे, सचिव श्री. गणेश बारहाते, मदतनीस श्री. मधुकर सिनगर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद व सहकारप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




