सुखना नदी संवर्धन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नदीकाठच्या वारसा स्थळांच्या विकासावर चिंतन

सुखना नदीकाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे!’ कविता संग्रहाचे लोकार्पण
सुखना नदी संवर्धन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नदीकाठच्या वारसा स्थळांच्या विकासावर चिंतन
बदनापूर : (प्रतिनिधी ) तिफण साहित्य संवाद उपक्रमांतर्गत वाकुळणी–माहेर भायगाव शिवारातील सुखना नदीकाठी प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांच्या ‘धोंडी धोंडी पाणी दे!’ या पाणी विषयक संपादित कवितासंग्रहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. निळकंठेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.सर्जेराव जिगे यांनी भूषविले, तर लोकार्पण पाणी प्रश्नांचे अभ्यासक,जलतज्ञ प्रकाश चोले तसेच प्रा.डॉ. राम रौनेकर, प्रा.डॉ.अशोकराव हुसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रा.डॉ. शिवाजी हुसे यांनी कवितासंग्रहाच्या निमित्ताने व सुखना नदी संवर्धनासंबंधी भूमिका मांडली. डॉ. सर्जेराव जिगे यांनी नदी, पाणी यांचे महत्व सांगून संग्रहावर भाष्य केले.
सुखना बचाओ जनआंदोलन संघर्ष समिती व तिफण वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमामध्ये साहित्य, पर्यावरण व समाज यांच्यातील सुसंवादाचा संदेश देण्यात आला. नदीकाठची वारसा स्थळे जपण्याची व त्यांना पर्यटनस्थळांप्रमाणे विकसित करण्याची गरज यावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रकाश चोले यांनी सुखना नदी संवर्धन, पाणी व्यवस्थापन, अवैध वाळू उपसा आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. नदी पुनरुज्जीवनाची चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्राध्यापक डॉ. राम रौनेकर यांनी आपल्या भाषणात संत-साधूंनीही जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केल्याचे सांगितले. यावेळी समिती तर्फे अनंतराव हुसे यांची अंबड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सुखना नदी संवर्धन व पुनरुज्जीवन, नदीकाठचा परिसर विकास, शेतकऱ्यांच्या अडचणी, अवैध वाळू उपसा या गंभीर विषयांवर विचारमंथन झाले. यात पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
या प्रसंगी माहेर भायगावचे सरपंच अर्जुन वाघ, शिवाजीराव कराड, अनंत हुसे, विठ्ठलराव लबडे, अर्जुनराव लबडे,लक्ष्मण वाघ, सुधीर कोळकर, दत्तात्रय अवघड, प्रकाश हुसे, रामनाथ शेळके तसेच सुखना बचाओ जनआंदोलन संघर्ष समितीचे सदस्य प्रा.संदीप हुसे,सोपान कोळकर, अनिल वावरे, गजानन दाभाडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन सोपान कोळकर यांनी तर आभार नितीन हुसे यांनी मानले.

जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य




