संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री व सौ कोयटे यांनी घेतले मनोभावे दर्शन
संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री व सौ कोयटे यांनी घेतले मनोभावे दर्शन
कोपरगाव प्रतिनीधी
संकष्टी गणेश चतुर्थी निमित्ताने कोपरगांव चे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थान,गणपती चावडी,कापड बाजार मंदिरात समता चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा श्री.काकासो तथा ओमप्रकाश कोयटे व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनीताई कोयटे तसेच ब्राम्हण सभा कोपरगाव चे अध्यक्ष श्री.मकरंद कोऱ्हाळकर सर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता को-हाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती करण्यात आली.तसेच आरती झाल्यानंतर मंदिराच्या वतीने श्री.काकासाहेब कोयटे यांचा सत्कार श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आला.तसेच इन्स्टाग्राम कंटेंट क्रीएटर दिव्यांका परदेशी यांचा देखील सत्कार श्री काकासाहेब कोयटे यांनी केला.
देवस्थान चे विश्वस्त श्री. सुरेश महाजन व श्री. सुभाष महाजन यांनी धार्मिक परंपरा टीकुन ठेवली. त्या बद्दल काकासाहेब कोयटे यांनी समाधान व्यक्त केले.कोपरगांवचे ग्रामदैवत गोकर्ण गणेश मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी,सौ.शामल कुलकर्णी,अजिंक्य पदे,विजय जोशी, संदीप जोशी, प्रकाश खंडागळे,जवाहर गुजराती, राजेंद्र डागा, जंगम काका आदि उपस्थित होते.पौरोहीत्य श्री.प्रदीप पदे गुरु यांनी केले. या नंतर भाविकांना साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले.शेवटी आभार प्रकाश खंडागळे यांनी मानले.





