पवित्र दक्षिण गंगा गोदावरी पवित्र राहिली आहे का…..?
पवित्र दक्षिण गंगा गोदावरी पवित्र राहिली आहे का…..?
कोपरगाव :- प्रतिनिधी
कोपरगाव शहराला ओळख करून देणाऱ्या दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले आहे ब्रह्मगिरी पासून ते आंध्र प्रदेश मधील राज महेंद्र पर्यंत गोदावरी नदी ही प्रदूषणाच्या विळाख्यात सापडलेली आहे. गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने अविरतपणे पाच वर्षापेक्षा जास्त काळ स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे दर शनिवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या बॉटल बिसलेरी बॉटल रॅपर सिगरेटचे तोटके प्लास्टिक ग्लास हस्ती विसर्जन करून टाकलेले बारदाने चपला बूट निरोध लेडीज चे पॅड हगीज प्लास्टिक पिशव्या गोधड्या खराब झालेले कपडे आध्यात्मिक ग्रंथ देवी देवतांच्या मुर्त्या फोटो अशी अनेक प्रकारची घाण नदी पात्रात ठिकाणी ठिकाणी आढळून येते.
गेल्या पाच वर्षांमध्ये गोदामाई सेवकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पवित्र अशा दक्षिणगंगा गोदावरी मधून बाहेर काढलेला आहे.
या पाच वर्षांमध्ये कोपरगाव तालुक्यातील के जे सौमया कॉलेज असेल एससीजीएम कॉलेज असेल संजीवनी कॉलेज असेल एस जी विद्यालय असेल के बी पी विद्यालय असेल कन्या शाळा असेल नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज असेल अशा अनेक संस्थांनी नदी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
गौतम ऋषींना शाप मुक्त करण्यासाठी भगवान शिव जी नी गंगा गोदावरीला आपल्या जटा ब्रह्मगिरी येथे आपटून पृथ्वीवर आणले आहे इतक्या सहजपणे गंगा गोदावरी पृथ्वीवर प्रकटली नाही हा इतिहास माहिती असून देखील कलियुगातील मनुष्यप्राणी पवित्र अशा ह्या दक्षिण गोदावरी नदीला प्रदूषित करत आहे.
गोदावरी नदीपात्रामध्ये सर्व प्रमुख शहरातील मलमूत्र केमिकल युक्त गटारी नदीपात्रामध्ये सरासपणे सोडण्यात आले आहे यावर कोणीच काही बोलत नाही. सध्या नदीची परिस्थिती खूपच बिकट आणि वाईट झालेली आहे तिचा आरोग्य धोक्यात आलेला आहे तिचे आरोग्य धोक्यात आलेले आहे जर आपली आई गोदावरी आजारी पडली तर आपण सुद्धा शंभर टक्के आजारी पडणार आहोत आपल्या नदीच्या आरोग्यावरून आपल्या शहरातील नागरिकाचा आरोग्य ठरले जाते तरी पण जाणीवपूर्वक म्हणा अजाणतेपणे म्हणा दक्षिणगंगा गोदावरीकडे दुर्लक्ष होत चालले आहे वेळीच याची काळजी किंवा दखल घेतली नाही तर येणाऱ्या पिढीला नदी नसून तर नाला बघायला मिळेल आणि स्वच्छ पाणी नसून प्रदूषित गटार बघायला मिळेल निसर्ग आपल्याला फुकट सर्व गोष्टी उपलब्ध करून देतो त्यामुळे त्याची किंमत आपल्याला नाही हीच गोष्ट ज्यावेळेस विकत घ्यावी लागेल किंवा नदीला बघायला तिकीट लावले तर तिचे महत्त्व कळेल म्हणून म्हणतो वेळी जागे व्हा आणि ज्या श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मणजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीतील गोदावरी नदीला म्हणजेच आपल्या आईला वाचवा आणि तिच्या आरोग्याची काळजी घ्या आपण तिची काळजी घेतली तरच ती आपली काळजी घेईल अन्यथा ती पण आपल्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाही.
धन्यवाद………!
*श्री आदिनाथ गो ढाकणे*
अध्यक्ष :- गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगांव
!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!