राहुल (दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि.प.शाळेत वृक्षारोपण
राहुल (दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि.प.शाळेत वृक्षारोपण
कोपरगाव :- प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील वारी साकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्यातून चिकू प्रजातीच्या दहा वृक्षांची गुरुवारी (दि.11) लागवड करण्यात आली.
याप्रसंगी वृक्षलागवड कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पोर्णिमा गोर्डे यांनी केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पालक, विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेच्या क्रीडांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके, बापूराव बहिरमल, संतोष भाटे, योगेश शिंदे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली निकम, उपाध्यक्ष अंबादास गिरी, भाऊसाहेब वरकड, सुरज टेके, महेंद्र महाले, भीमराव लांडगे, ज्ञानेश्वर बनकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा गजभिव, वृषाली टेके, वज्रेश्वरी देसले, कल्पना निळे, रोहिणी कडू, ताराबाई गायकवाड, शोभा त्रिभुवन, संगीता भालेराव, सविता शिंदे, नरसिंग शेख, करिष्मा तानसरे, सुमन मोरे, रूपाली टोपले, प्रवीण आहेर, निवृत्ती गोडे, परसराम टोपले, मंगल कहार, अमृता काजळे, शंभूराजे गोर्डे उपस्थित होते.
!! *जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य* !!