Breaking
ब्रेकिंग

संत तुकारामांची अभंगरचनेमागील भूमिका समजून घेणे गरजेचे: प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे

0 0 4 7 7 7

संत तुकारामांची अभंगरचनेमागील भूमिका समजून घेणे गरजेचे: प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे

कन्नडः संत तुकारामांची अभंगकविता मनाला ऊर्जा देणारी आहे. जणांच्या कल्याणासाठी हितोपदेश करणारी आहे. अभंगरचनेमागील संत तुकारामांची ओढ ही मानवी कल्याणाची आहे. संत तुकाराम आपली अभंगलेखनामागील भूमिका जाहीर मांडतात. ही भूमिका समजून घेणे गरजेचे आहे असे विचार प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे यांनी व्यक्त केले. ते डॉ. सुभाष बागल लिखित ‘संत तुकारामांचे अभंग: एक चिंतन ‘ या ग्रंथावर आधारित कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या बीजभाषण प्रसंगी बोलत होते. शिवाजी महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या बीज भाषण प्रसंगी प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे म्हणाले की संत तुकारामांची अभंगकविता निराधारांना आधार देणारी, रंजल्या गांजल्यांची आत्मियतेने सेवा करणारी, आपुलकीने, सद् व्यवहाराने, विवेकाने, जनांशी व्यवहार करणारी, तन-मन-धनाने, तन्मयतेने ईश्वरभक्तीत लिन होणारी कविता आहे. संत तुकारामांची अभंगरचना ही स्वानुभावातून आलेली आहे. तन्मयतेने केलेली विठ्ठल भक्ती आणि जनकल्याण हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मानवतावाद ही तिची भूमिका आहे. ती समजून घेणे गरजेचे आहे असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले हे होते. चर्चासत्राचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक देशमाने यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी संत तुकाराम हे विशाल व्यक्तिमत्त्वाचे संत होते. संतांच्या अभंगवाणीने समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे कार्य केले. डॉ. सुभाष बागल यांनी या ग्रंथरूपाने मांडलेले हे चिंतन अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा ग्रंथांची आवश्यकता आहे. अशा ग्रंथामुळे तुकारामांची कविता विविधांगाने समजून घेता येईल. त्यासाठी अशा चर्चा सत्राची सुद्धा आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश लिपाने, ‘संत तुकारामांचे अभंग: एक चिंतन ‘ या ग्रंथाचे लेखक डॉ. सुभाष बागल शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभंग गाऊन मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. डॉ. शिवाजी हुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र झाडे यांनी केले प्रदर्शन डॉ. प्रेमला मुखेडकर यांनी केले. उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. सुभाष बागल यांनी महाविद्यालयातील अध्यासन केंद्रासाठी पाच ग्रंथ भेट म्हणून दिले. त्याचा स्वीकार प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी केला. या राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातून मनावर प्राध्यापक मंडळी आली होती. चार भागामध्ये झालेल्या या चर्चासत्रात सकाळच्या उद्घाटना सत्रामध्ये संत तुकारामांचे अभंगरचनेमागील भूमिका विषयावर भाषणे झाली. दुसरे सत्रामध्ये ‘संत तुकारामांची अभंगरचने मागील प्रेरणा ‘ या विषयावर सांगली येथून आलेले डॉ. धनंजय होनमाने, डॉ.न.भ. कदम आणि डॉ. बालाजी जाधव यांनी आपले विचार मांडले. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. दत्तात्रेय डुंबरे हे होते. दुपारच्या तिसऱ्या सत्रामध्ये ‘संत तुकारामांची अभंगवाणी आणि भावाविष्कार’ या विषयावर विविध महाविद्यालयातून आलेल्या अभ्यासक, प्राध्यापकांनी संत तुकारामांच्या विविध रचना प्रकारावर निबंध सादर केले. त्यामध्ये डॉ. पुरुषोत्तम जुन्ने,( अंबड ), डॉ. राम रौनेकर,( अंबड ) डॉ संतोष तांदळे,( सोयगांव ), डॉ. मोहन बाभुळगावकर,( छत्रपती संभाजी नगर ), डॉ. अनिता खंडागळे,( लिंबाजी चिंचोली ) डॉ. ऋषी बाबा शिंदे ( घनसावंगी ), डॉ. शेख एजाज,( खुलताबाद ) यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी आपले निबंध सादर केले. तिसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप बिरुटे हे होते. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रुपेश मोरे हे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी,संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे