कोपरगाव नगरपरिषदेत कार्यरत सौ.रोहिणी हिरामण जाधव(साबळे) यांची STI परीक्षेत दमदार भरारी
ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर उंच भरारी

🇮🇳 कोपरगाव नगरपरिषदेत कार्यरत सौ.रोहिणी हिरामण जाधव(साबळे) यांची STI परीक्षेत दमदार भरारी 🇮🇳
🌹ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर उंच भरारी🌹
✍️ महेश थोरात ✍️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अनेकदा अपयशाची मालिका, परीक्षांचे लांबलेले वेळापत्रक, प्रतिकूल परिस्थिती आणि मानसिक खचणे हे टप्पे येतात. मात्र, या सगळ्यावर मात करून ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करणाऱ्या सौ. रोहिणी हिरामण जाधव ( साबळे ) यांनी जिद्द, संयम आणि अभ्यासातील सातत्याच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. *विशेष म्हणजे कोपरगाव नगरपरिषदेत कर निरीक्षक म्हणून नोकरी सांभाळत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या STI परीक्षेत यश मिळवले, ही त्यांच्या संघर्षमय प्रवासाची विशेष बाब ठरली आहे.*
🎯 *गावातील ZP शाळेपासून गुणवत्तेच्या प्रवासाला सुरुवात*
मूळच्या मु.पो. शिंपोरे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील रोहिणी जाधव यांचे *प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील हायस्कूलमध्ये घेताना त्यांनी अभ्यासात सातत्य कायम ठेवले.*
दहावीच्या परीक्षेत तब्बल 82.92 टक्के गुण मिळवत वर्गात प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी आपल्या गुणवत्तेची पहिली ठोस छाप उमटवली.
यानंतर बारामती येथील व्ही.पी. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यातील VIIT महाविद्यालयातून Computer Engineering ही पदवी संपादन केली.
पदवी घेतल्यानंतर काही काळ नोकरीच्या शोधात आणि नोकरी करत असतानाच मनात एक वेगळे ध्येय आकार घेत होते. केवळ *नोकरीपुरते मर्यादित न राहता प्रशासनाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा निर्माण झाली.*
2018 पासून पुण्यात आप्पा बळवंत चौक येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नांमध्ये मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले.
2019 मध्ये STI आणि ASO मुख्य परीक्षेपर्यंत मजल, तसेच राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले. मात्र, अंतिम निवडीच्या टप्प्यावर पदाने हुलकावणी दिली.
📖*कोरोना काळ, अपयश आणि तरीही न सोडलेली वाट*
त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीच्या काळात परीक्षा वेळेत झाल्या नाहीत. अभ्यासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आणि मानसिक ताणही वाढला. एक वेळ अशी आली की MPSCचा अभ्यासच सोडून द्यावा, असेही त्यांना वाटू लागले.
मात्र, मनातील ध्येय आणि आतापर्यंत केलेल्या अभ्यासाने त्यांना पुन्हा उभारी दिली.
2021 मध्ये STI मुख्य परीक्षा दिली परंतु काही गुणांनी पद हुकले.
2022 मध्ये पुन्हा राज्यसेवा मुलाखतीपर्यंत मजल मारली मात्र यावेळीही अंतिम निवड झाली नाही.
*अपयश वारंवार आले, पण प्रत्येक परीक्षेसाठी केलेला अभ्यास त्यांच्या पुढील प्रयत्नांसाठी भक्कम पाया ठरत गेला.*
सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रयत्नांचे फलित अखेर मिळाले. *2023 मध्ये तलाठी तसेच नगरपरिषदेमधील पदासाठी त्यांची निवड झाली.*
*सुमारे सहा महिने तलाठी म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेत कर निरीक्षक पदावर रुजू होत शासकीय सेवेला सुरुवात केली.*
*मात्र, कोपरगावची नोकरी आणि पुण्यातील राहते घर यामधील मोठे अंतर त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आव्हानात्मक होते. तरीही त्यांनी नोकरी सोडण्याचा मार्ग स्वीकारला नाही उलट नोकरीसोबतच आपले अंतिम ध्येय गाठण्याचा निर्धार केला.*
नोकरीसोबत MPSCची तयारी
कोपरगाव नगरपरिषदेत काम करत असतानाही त्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली नाही.
💯*नोकरीच्या वेळेपूर्वी रोज सकाळी कोपरगाव नगरपरिषद संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत बसून त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.*
नोकरीची जबाबदारी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यांचा मेळ घालत त्यांनी 2024 ची STI मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली.
अनेक वर्षांच्या अभ्यासाचे सातत्य, पूर्वीच्या परीक्षांचा अनुभव आणि संकल्पनांची भक्कम तयारी यांचा फायदा झाला आणि अखेर STI परीक्षेत यश मिळाले.
मध्यमवर्गीय कुटुंबातून मिळाले शिक्षणाचे संस्कार
रोहिणी जाधव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांचे वडील ADCC बँकेत कॅशियर पदावरून निवृत्त झाले असून आई गृहिणी तसेच शेतकरी आहेत.
पाच भावंडांच्या या कुटुंबात शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले. मोठे भाऊ नामांकित MNC कंपनीत Manager पदावर कार्यरत असून ते IT Engineer आहेत. तीन मोठ्या बहिणींपैकी दोन पुण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षिका आहेत, तर एक बहीण B.Pharmacy पदवीधर असून Cognizant मध्ये कार्यरत आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असली तरी शिक्षणाबाबतची भूमिका नेहमीच समृद्ध होती. *आंबेडकरवादी विचारांचा वारसा लाभलेल्या कुटुंबात शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन मानले गेले.*
विशेषतः आईने वेळोवेळी सांगितलेले *शिक्षणाचे महत्त्व* आणि संपूर्ण प्रवासात दिलेली खंबीर साथ रोहिणी यांच्या यशासाठी प्रेरणादायी ठरली.
🏆रोहिणी जाधव यांच्या मते, दहावीपर्यंत त्यांनी केलेला प्रामाणिक अभ्यास पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अत्यंत उपयोगी ठरला.
त्या सांगतात, *मुलांनो, जे काही कराल ते 100 टक्के देऊन करा. कोणताही अभ्यास कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठे त्याचा फायदा होतोच. त्यामुळे मूलभूत संकल्पना म्हणजेच basics स्पष्ट ठेवा. केवळ पाठांतर करण्यापेक्षा concepts clear करण्यावर भर द्या.*
त्यांचा हा संदेश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे.
💯*अपयशाने थांबू नका प्रत्येक प्रयत्न पुढच्या यशाची तयारी असते.*
रोहिणी जाधव यांचा प्रवास केवळ एका परीक्षेतील यशाची कथा नाही. *हा प्रवास आहे अनेक अपयशांनंतरही ध्येय न सोडण्याचा, नोकरी सांभाळून अभ्यास करण्याचा आणि परिस्थितीपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा.*
2019 पासून मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अंतिम निवड न होणे, कोरोना काळातील खंड, 2021 मध्ये काही गुणांनी हुकलेले STI पद, 2022 मधील राज्यसेवा मुलाखतीनंतरही न मिळालेले यश या प्रत्येक टप्प्याने त्यांना खचवण्याऐवजी अधिक सक्षम केले.
आज कोपरगाव नगरपरिषदेत कर निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना मिळवलेले STI परीक्षेतील यश हे त्यांच्या जिद्दीला मिळालेले सार्थक फलित आहे.
रोहिणी हिरामण जाधव यांचा हा प्रवास सांगतो
*ध्येय मोठे असेल, तर अडथळे कितीही मोठे असले तरी सातत्याने केलेली मेहनत एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाते*
रोहिणी जाधव यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹
✍️ महेश थोरात✍️
कोपरगाव नगरपरिषद संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय




