श्री साईबाबा मंदिर महिला सुरक्षा कर्मचारी श्रीमती बेबीताई नागरे यांचा प्रामाणिकपणा
श्री साईबाबा मंदिर महिला सुरक्षा कर्मचारी श्रीमती बेबीताई नागरे यांचा प्रामाणिकपणा
शिर्डी :- प्रतिनिधी
आज रोजी श्रीसाईबाबा मुख दर्शन गेट जवळ कायम कंत्राटी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई अशोक नागरे यांना एक पर्स सापडली. त्यात 18,750/- रु रोख रक्कम होती. त्यांनी ती पर्स संरक्षण ऑफिस ला जमा केली. त्यानंतर हैद्राबाद येथील साईभक्त के. मंजुला ह्या संरक्षण ऑफिस ला पैसे हरविल्याची तक्रार द्यायला आल्या असता, ओळख पटवून त्यांना त्यांचे 18,750/- रु परत दिले. त्यांनी संस्थान प्रशाशनाविषयी कृतघ्नता व्यक्त केली.
श्रीमती बेबीताई नागरे ह्या कायम कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना महिन्याचा पगार 18000/- रु आहे. कोपरगाव वरून ये जा करतात. अतिशय प्रामाणीक आहेत. वय झालेले आहे तरीदेखील पालखी मिरवणूक, रथ मिरवणूक करिता रात्री उशिरा पर्यंत थांबतात. त्यांची आस्थेने विचारपूस करून चहा पाजला, अश्या लोकांचा सत्कार करायला देखील अतिशय आनंद वाटतो.
श्री साईबाबा संस्थान मंदिर प्रमुख PSI श्री रोहिदास माळी सर यांनी श्रीमती बेबीताई अशोक नागरे यांचा सन्मान केला.
जय गोदामांची……!
जय त्र्यंबकराज…….!!
जय शुक्राचार्य………!!!