Breaking
ब्रेकिंग

“ *शिस्तीच्या छायेखाली उजळलेले दीप…* ‘को ऱ्हाळकरांची शाळा’ म्हणून अजरामर झालेली परंपरा

0 1 0 5 4 0

 

“ *शिस्तीच्या छायेखाली उजळलेले दीप…*

‘को ऱ्हाळकरांची शाळा’ म्हणून अजरामर झालेली परंपरा

कोपरगावच्या इतिहासाची पाने उलगडली,
की काही *अक्षरं* स्वतःच उजळून दिसतात…
ती *अक्षरं* म्हणजे केवळ नावं नसतात,
तर ती असतात..
घडलेल्या आयुष्यांची *सुवर्ण* साक्ष…
*श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय* (एस. जी. विद्यालय)
या नावातच एक परंपरा दडलेली आहे…
*ज्ञानाची* , *संस्कारांची* , आणि *माणूस* घडवण्याची…
या विद्यालयाने केवळ विद्यार्थी घडवले नाहीत,
तर अनेक *हिरे* घडविले आहेत
जे काळाच्या अंधारातही
*स्वतःच्या तेजाने* उजळत राहिले काल आज ही..
आणि त्या *तेजस्वी* परंपरेच्या *केंद्रस्थानी*
एक व्यक्तिमत्त्व ठाम उभं होतं
*आर. जी.*
*को ऱ्हाळकर* *सर* !
शाळा म्हणजे इमारत नव्हे,
तर एक जिवंत *संस्कार* असतो
हे त्यांनी आपल्या अस्तित्वाने सिद्ध केलं…
म्हणूनच लोक म्हणू लागले
“ही एस. जी. विद्यालय नाही…
ही तर
*को ऱ्हाळकरांची* शाळा!”
*सर* पोर्चमध्ये उभे राहिले की
जणू वेळच थबकून उभा राहायचा…
आणि अचानक
मुलांच्या गजबजाटात एक आवाज घुमायचा
“ *आला रे आला* ”
तो एकच *कल्ला*
आणि पुढच्याच क्षणी
संपूर्ण शाळा जणू *समाधीस्थ*
प्रचंड शांत
जणू वाऱ्यालाही थांबून ऐकावंसं वाटावं
अशी ती *क्षणांची* *शिस्त*
ती भीती नव्हती,
तो होता *आदराचा* थरार…
त्या एका *व्यक्तिमत्त्वाने*
शेकडो मनांना एकाच क्षणी
*स्वतःच्या कवेत* घेतलं होतं
*सायन्स* आणि *गणिताचे* धडे
ते शिकवत नव्हते
तर विद्यार्थ्यांच्या *अंतरंगात रुजवत* होते…
*इंग्रजीची* त्यांची पकड
आणि विचारांची त्यांची उंची
त्या काळालाही भेदून जाणारी होती
पण या सगळ्यांपेक्षा मोठं होतं
त्यांचं *माणूस* *घडवण्याचं ध्येय…*
आणि त्या *शिस्तीच्या* सावलीत
एक छोटासा गूढही दडलेला असायचा
*सरांच्या* हातामागे
हलकेच लपलेली एक *छडी*
ती दिसायची नाही,
पण तिचं *अस्तित्व*
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाला ठाऊक असायचं
आणि कधी ती *छडी*
हातावर हलकेच उतरली,
की ती *वेदना* नव्हती
ती होती आयुष्याला *वळण* देणारी शिकवण
आज आठवलं की हसूही येतं,
आणि डोळ्यांत पाणीही दाटतं…
“ *सर*
तुमची ती छडी पुन्हा एकदा खायची आहे…”
कारण त्या *छडीच्या* *स्पर्शात*
राग नव्हता
तर प्रेमाचा कठोर *आविष्कार* होता…
जो आम्हाला घडवत होता,
घडवत राहिला…
आजही जुन्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर
एकच वाक्य सहज उमटतं
“आम्ही एस. जी. चे नव्हतो…
आम्ही
*को ऱ्हाळकरांच्या* शाळेचे होतो!”
कारण त्यांनी शाळेला ओळख दिली नाही,
तर ओळखीलाच *आत्मा* दिला…
आज *सर* या इहलोकात नाहीत…
पण त्यांच्या आठवणी
त्या अजूनही प्रत्येकाच्या *हृदयात*
एक शांत, अखंड *ज्योतीसारख्या तेवत* आहेत
जसं *श्यामची आई* वाचताना
मनात *संस्कारांची* ऊब निर्माण होते,
किंवा *मृत्युंजय* मधून
अविरत *संघर्षाची* जाणीव जागी होते…
तसं *को ऱ्हाळकर* सरांचं स्मरण
प्रत्येक वेळी मनाला पुन्हा घडवत राहतं.
आणि त्या शब्दांना *जीवन* देणारे
*साने गुरुजी*
आणि *शिवाजी* *सावंत*
जसे लेखणीने प्रेरणा देतात,
तशी प्रेरणा *सरांनी*
जगून दिली…
अशा या तेजस्वी परंपरेचा दीप
त्यांचे सुपुत्र *दीपक* यांच्या रूपाने
आजही शांतपणे तेवत आहे…
जणू ती ज्योत *सुमन* नच
*सरांची* छाया अजूनही जिवंत आहे…
*सर* …
तुम्ही काळाच्या पल्याड गेलात,
पण तुमचं *अस्तित्व* अजूनही जिवंत आहे
आमच्या *विचारांत* ,
आमच्या कृतीत,
आणि आमच्या प्रत्येक यशामागे…
तुम्ही आम्हाला दिलेली *शिस्त*
ही आमची ओळख आहे…
आणि तुमची आठवण
ही आमच्या आयुष्याची सर्वात मोठी *संपत्ती*
मनःपूर्वक *मानाचा* *मुजरा*
त्या *ध्येयवेड्या* , कणखर, आणि करुणामय गुरूंना!
आमच्या R G..ना

गोरे सर
कोपरगाव
९८५० ६१३ ६१२
🙏🤝

1/5 - (1 vote)

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 5 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे