जल ही जीवन, पाणी आडवा पाणी जिरवा, अशा घोषणा देऊन नागरिकांना जागृत करणारे प्रशासन नेमकं इथेच येऊन का थांबून जातं हेच कळत नाही

जल ही जीवन, पाणी आडवा पाणी जिरवा, अशा घोषणा देऊन नागरिकांना जागृत करणारे प्रशासन नेमकं इथेच येऊन का थांबून जातं हेच कळत नाही
कोपरगाव नगर परिषदेचा एक महत्त्वपूर्ण भाग परंतु कायमच सावत्र वागणूक दिला जाणारा भाग म्हणजे बेट भाग
कोपरगाव :- प्रतिनिधी
कोपरगाव बेट नाका या ठिकाणी बेट व मोहनी राजनगर या भागांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेली कित्येक महिन्यांपासून नगर मनमाड हायवे बेट कोपरगाव या ठिकाणी लिकेज आहे हजारो लिटर पाणी वाया तर जातच आणि या पाण्यामुळे सततच त्या रस्त्याला खड्डे पडत आहेत त्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा ही मोठा प्रश्न निर्माण होत आहे
या लिकेजमुळे व वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिकांना रस्ता क्रॉस करणे म्हणजे जीवमुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे बनले आहे
सतत या ठिकाणी पाणी गळती सुरू असताना सुद्धा हा प्रश्न का मार्गी लावला जात नाही हे आता अकलनीय झाले आहे
नेमका हा प्रश्न कोणी सोडवायचा
नगर मनमाड हायवे रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टदाराने की कोपरगाव नगरपरिषदेने याचा खुलासा करावा
अजून किती दिवस या पाणी गळतीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार
हे आता देवच जाणे




