गुरू शुक्राचार्य महाराज मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १८ ते २३ ऑगस्ट ला आयोजित करण्यात आला आहे.
गुरू शुक्राचार्य महाराज मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १८ ते २३ ऑगस्ट ला आयोजित करण्यात आला आहे.
कोपरगाव :- प्रतिनिधी
जय शुक्राचार्य……. पुण्य व पावन भूमी असलेल्या बेटातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केलेला आहे सोहळा 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट असा असणार आहे या सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांचे सहयोग खूप गरजेचा असतो म्हणूनच आपण उद्या गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये बेटातील सर्व नागरिकांची मीटिंग घेत आहोत या मीटिंगमध्ये ना भूतो न भविष्यती असा जो सोहळा आपल्या गावामध्ये होणार आहे त्या सोहळ्याची माहिती देण्यासाठी तसेच आपल्या सर्वांचे या संदर्भामध्ये काही सूचना असतील तर त्या ऐकून घेण्यासाठी ही मीटिंग मंदिर प्रशासनाने आयोजित केलेली आहे म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की आपण उद्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये ठीक बारा वाजता उपस्थित राहावे.
आपले नम्र. मंदिर प्रशासन
जय गोदामाई……!
जय त्र्यंबकराज…..!!
जय शुक्राचार्य…….!!!