गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि साई ग्रुपने संयुक्त पणे केले गोदावरी स्वच्छता अभियान
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि साई ग्रुपने संयुक्त पणे केले गोदावरी स्वच्छता अभियान
कोपरगाव :- प्रतिनिधी
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे ५ वर्षों पासून सेवा स्वच्छता अभियान सुरू आहे. आज दिनांक २3 जून रोजी या अभियानात कोपरगाव मधील प्राथमिक शिक्षकांच्या साई ग्रुपने सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी जपत नदी स्वच्छतेच्या अभियानात सहभाग घेऊन गोदावरी नदीच्या पात्रातील प्लास्टिक कचरा, जूने कपडे ,नारळ ,दारुच्या बॉटल,पोताडे, आध्यात्मिक ग्रंथ यांच बरोबर इतरही कचरा गोळा केला. नदी स्वच्छ राखण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे यासाठी नदी स्वच्छतेसाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी आई गोदावरी ला स्वच्छ व सुंदर अविरल पणे वाहती ठेवण्याचा संदेश दिला.
यावेळी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष :- आदिनाथ ढाकणे, सोमनाथ पाटील,प्रा.शिला गाडे मॅडम, आप्पा नवले, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे, निखिल दिवटे, समाधान कंदे आणि जनार्दन सुपेकर उपस्थित होते.
याच बरोबर साई ग्रुपचे सदस्य , ज्ञानेश्वर वाकचौरे ,शरद शिंदे ,गोविंद आढळ ,आशिष पारडे ,अनिल इंगळे ,विलास महिरे ,सुरेश जोंधळे, सतीश गर्जे, श्रीराम तांबे, अमोल थिटे या सर्व सदस्यांसह स्वच्छता अभियान 7 ते 9 या वेळेमध्ये यशस्वीपणे पार करून गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि साई ग्रुप चे सर्व सदस्यांनी एक सामाजिक बांधिलकी आई गोदावरी ची सेवा स्वच्छता अभियान केले.