ब्रेकिंग
साऊ सरस्वती :- सुवर्णा पाटुकले

0
1
0
3
3
0
साऊ सरस्वती
साऊ सरस्वतीचाच
असे एक अवतार
स्त्रीला शिक्षण देण्याचा
तिने केला हो निर्धार
ज्योतीसाऊ पुढे आले
स्त्रीचा कराया उद्धार
जागा केला स्वाभिमान
नष्ट जगणे लाचार
हाल अपेष्टानी कधी
नाही घेतली माघार
ध्येय उद्दीष्ट गाठले
केला प्रथेवर वार
केले समाजाने किती
छळ आणि अत्याचार
खुले केले शिक्षणाने
ज्ञान प्रकाशाचे दार
शिक्षिकेचा पहिल्याच
मान मिळविला खास
केली मुलींसाठी शाळा
दिला शिक्षणाचा ध्यास
पूजनीय दांपत्याचे
ऋण ना हे फिटणारे
प्रगतीस स्त्री जातीच्या
दिले आयुष्य हे सारे……
स्त्रीचे बदलले रुप
झाली प्रगती शिकली
साऊ ज्योतिबाची याद
सांगा किती हो राखली
नका विसरू बायानो
ठेवा कृतज्ञता मनी
ज्यांनी आणला उजेड
आज आपल्या जीवनी
अशा मायबापास या
करू शतश: नमन
केला उद्धार हो ज्यांनी
त्यांचे करू या स्मरण
सुवर्णा पाटुकले
सातारा.
0
1
0
3
3
0




